Suryakumar Yadav : कॉलेजमध्ये असताना सुर्यकुमार पडला होता साऊथ मुलीच्या प्रेमात, जाणून घ्या त्यांची मनोरंजक कहाणी
सुर्यकु्मारची यादवची 2012 ला देविकाशी भेट झाली होती. ही त्यांची मुलाखत मुंबईच्या पोद्दार कॉलेजमध्ये झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्र झाले.

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) आणि क्रिकेट खेळाडूंचं प्रेम हे समीकरण कायम राहिलं आहे. आत्तापर्यंत अनेक क्रिकेट खेळाडूंनी बॉलीवूडच्या तारकांशी लग्नगाठ बांधली आहे. भारतात अशा असंख्य जोड्या आहेत. सध्या भारतीय संघात अनेक नवीन खेळाडू आहेत. त्यांची देखील अनेक प्रकरणे अनेकदा उघडकीस आली आहेत. सध्या सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा भारतीय संघाचा (Indian Team) आघाडीचा फलंदाज आहे. त्याच्या लव्हस्टोरीची चर्चा सोशल मी़डियावर अधिक आहे. सुर्यकुमार यादव कॉलेजमध्ये असताना प्रेम झालं होतं. तो चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिला आहे.
प्रत्येक खेळाडूची वेगळी प्रेम कहाणी आहे
प्रत्येक खेळाडूची वेगळी प्रेम कहाणी आहे, सुर्यकुमार यादवच्या पत्नीतं नाव देविशा आहे. दोघांची ओळख 2012 मध्ये झाली आहे. त्यावेळी ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. दोघही चारवर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी 29 मे 2016 मध्ये लग्न केलं. काल सुर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केल्यानंतर त्याच्या लव्हस्टोरीची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. काल सुर्यकुमार यादव याने 26 चेंडूत 68 रन केले. आत्तापर्यंत सुर्यकुमार यादव याने चांगली बॅटिंग केली आहे. त्याची वादळी खेळी अनेकदा त्याच्या चाहत्यांना आकर्षित करुन गेली आहे. भारतीय संघासाठी सुध्दा त्याने चांगली कामगिरी केली आहे.
सुर्यकु्मारची यादवची 2012 ला देविकाशी भेट झाली
सुर्यकु्मारची यादवची 2012 ला देविकाशी भेट झाली होती. ही त्यांची मुलाखत मुंबईच्या पोद्दार कॉलेजमध्ये झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्र झाले. सुर्यकुमार यादवला देविकाचा डान्स अधिक आवडला होता. त्यानंतर देविकाने यादवला लगेच होकार दिला नव्हता. दोघांनी एकमेकाला चांगलं ओळखल्यानंतर लग्नाला देविकाने होकार दिला. भारतात होणाऱ्या आयपीएलमध्ये सुद्धा सुर्यकुमार यादव याने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे सध्या अधिक चाहते क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात.
