IND vs ENG : भारत की इंग्लंड… टी 20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये कोणाचं पारड भारी ? जाणून घ्या Head to Head Record

टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केलं. 5 मार्चला इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये किती वेळा एकमेकांच्या समोर आले, कोण जिंकलं ?

IND vs ENG : भारत की इंग्लंड... टी 20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये कोणाचं पारड भारी ? जाणून घ्या Head to Head Record
भारत वि. इंग्लंड
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 03, 2026 | 9:43 AM

T20 World Cup 2026 : टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव करून सेमीफायनलमध्ये धडक मारली. येत्या 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सेमीफयानलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होईल. टी-20 वर्ल्डकपच्या सेमाफायनलमध्ये पोहोचण्याची टीम इंडियाची ही सहावी वेळ आहे. तसेच सलग तिसऱ्यांदा सेमीफायलनची फेरी त्यांनी गाठली आहे.

सेमी फायनलमध्ये कोणत्या संघाचं पारडं भारी ?

टी20 वर्ल्ड कपच्या गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये (2022 आणि 2024), भारतीय संघाने फक्त इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरी खेळली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सलग तिसरा टी-20 वर्ल्डकप सेमीफायनल सामना आहे. गेल्या दोन सामन्यांचे निकाल पाहता, भारत किंवा इंग्लंड यापैकी जो संघ उपांत्य सामना जिंकला आहे, तो चॅम्पियन ठरला आहे.

टी20 वर्ल्ड कप 2022 सेमीफायनलमध्ये इंगल्ड ठरला विजेता

टी20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये भारत वि इंग्लंड सामना झाला होता. अ‍ॅडलेडमधील सामन्यात रोहित शर्माच्या टीम इंडियाने 6 बाद 168 धावा केल्या. जोस बटलरच्या इंग्लंडने 16 षटकांत एकही गडी न गमावता 170 धावा केल्या आणि सामना 10 विकेट्सने जिंकला. अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून इंग्लंडने वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले.

भारताने टी20 वर्ल्ड कप 2024 सेमीफायनलमध्ये मारली बाजी

टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड आमनेसामने आले. जॉर्जटाऊन येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी गमावून 171 धावा केल्या. इंग्लंडचा संघ 16.4 षटकांत 103 धावांवर गारद झाला आणि त्यांना 68 धावांनी पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले.

भारत आणि इंग्लंडने दोनदा जिंकला टी 20 वर्ल्डकप

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या दोन सेमीफायनल सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला विजेतेपद मिळाले आहे. 5 मार्च रोजी होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2026 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेता यावेळी विजेता म्हणून उदयास येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. भारतीय संघाने 2007 आणि 2024 मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता तर इंग्लंडने 2010 साली 2022 मध्ये विजेतेपद पटकावलं.

Follow Us