वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीचं टी ट्वेण्टी करिअर संपलं?

वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीचं टी ट्वेण्टी करिअर संपलं?

मुंबई:  भारताला टी ट्वेण्टी वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला टी ट्वेण्टी संघात स्थान मिळालं नाही. भारत दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी ट्वेण्टी मालिकेतून धोनीला वगळण्यात आलं आहेच, शिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणाऱ्या टी ट्वेण्टी मालिकेतही धोनीला संधी मिळू शकलेली नाही. शुक्रवारी 26 ऑक्टोबरला भारतीय संघाची घोषणा झाली, यावेळी निवड झालेल्या टीममध्ये धोनीचं नाव नसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे कर्णधार विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी ट्वेण्टी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी रोहित शर्मा भारताचं नेतृत्व सांभाळेल.

निवड समितीच्या घोषणेनंतर सातत्याने धोनीच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. धोनीला संघाबाहेर बसवणं हे अनेकांना अद्याप पचलेलं नाही. कारण भारताने 2007 मध्ये धोनीच्याच नेतृत्त्वात टी 20 वर्ल्डकप जिंकला होता. या निवडीनंतर निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांना धोनीचं टी ट्वेण्टी करिअर संपलं का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “नाही, आताच नाही. आम्ही केवळ दुसऱ्या विकेटकीपरची चाचपणी करत आहोत”.

धोनीचा ढासळता फॉर्म

गेल्या अनेक दिवसांपासून धोनी चमकदार कामगिरी करु शकलेला नाही. आशिया चषकात तर धोनीने अवघ्या 19.25 च्या सरासरीने केवळ 77 धावा केल्या. या वर्षातील 10 डावांमध्ये त्याने28.12 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. इंग्लंडमधील 20 वन डे सामन्यात तो एकही शतक ठोकू शकला नाही. धोनीचा फॉर्म सातत्याने ढासळत आहे. त्यामुळेच पहिल्यांदाच धोनीला संघातून वगळल्याची चर्चा आहे.

धोनीच्या जागी ऋषभ पंत

दरम्यान, धोनीच्या जागी ऋषभ पंत विकेटकिपिंग सांभाळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत ऋषभ पंतच्या जोडीला पार्थिव पटेलचीही यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

 ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी20 मालिका

पहिला सामना – 21 नोव्हेंबर

दुसरा सामना – 23 नोव्हेंबर

तिसरा सामना – 25 नोव्हेंबर

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

Published On - 4:03 pm, Tue, 30 October 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI