AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, Semi Final: नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आमि वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. पण सूर्यकुमार यादव काय म्हणाला? जाणून घ्या

IND vs ENG, Semi Final: नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
IND vs ENG, Semi Final: नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला? Image Credit source: PTI
| Updated on: Mar 05, 2026 | 6:52 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा खूपच महत्त्वाचा होता. कारण या सामन्यापूर्वी दव फॅक्टर आणि इतर गोष्टींची चर्चा होत होती. त्यामुळे भारताने नाणेफेक जिंकावी आणि प्रथम गोलंदाजी घ्यावी अशी इच्छा क्रीडाप्रेमींची होती. पण तसं झालं नाही. भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे आता टीम इंडियाला 200 पार धावा करण्याशिवाय पर्याय नाही असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण 160-170 धावा जिंकण्यासाठी दिल्या तर हे आव्हान रोखणं गोलंदाजांना कठीण जाईल. असं असताना नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर सूर्यकुमार यादवने काय घेतलं असतं असा प्रश्न अनेकांना पडला. त्याने या प्रश्नाचं उत्तर नाणेफेकीनंतर लगेच दिलं.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. सूर्यकुमार यादवचं उत्तर ऐकून टीम इंडियाच्या मनासारखं झाल्याचं दिसत आहे. पण हा निर्णय खरंच योग्य ठरले का? हे सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, उपांत्य फेरी, मोठा सामना, आणि वाराही आहे. जास्त दव पडेल असे वाटत नाही. खेळपट्टी चांगली दिसतेय. सर्व क्युरेटर आणि ग्राउंड्समनना याचं श्रेय जाईल. सूर्यकुमार यादवच्या मनसारखा निर्णय झाला आहे. पण दुसऱ्या डावात दव पडेल की नाही हे काही सांगता येत नाही. जर दव पडला तर गोलंदाजांना खूपच कठीण जाईल.

कर्णधार सूर्यकुमार यादव या महत्त्वाच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये कोणाला प्राधान्य देणार याची उत्सुकता होती. पण त्यातही त्याने काही बदल केलेला नाही. सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेला संघ यावेळी मैदानात उतरणारआहे. खासकरून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपनिंग करतील असं दिसत आहे. त्यामुळे संजू सॅमसन आणि इशान किशन ओपनिंग करेल या चर्चा हवेतच विरल्या आहेत.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.