ICC Women’s T20 World Cup 2020 : वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, हरमनप्रीत कौर कर्णधार

आयसीसी महिला T-20 विश्वचषकासाठी (ICC Women’s T20 World Cup 2020) महिला भारतीय संघाची घोषणा झाली आहे. 15 खेळाडूंच्या या संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे.

ICC Women’s T20 World Cup 2020 : वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, हरमनप्रीत कौर कर्णधार

ICC Women’s T20 World Cup 2020 : मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये पुढील महिन्यात खेळवण्यात येणाऱ्या (21 फेब्रुवारी) आयसीसी महिला T-20 विश्वचषकासाठी (ICC Women’s T20 World Cup 2020) महिला भारतीय संघाची घोषणा झाली आहे. 15 खेळाडूंच्या या संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी संघाची घोषणा केली. या संघात स्मृती मंधाना ही उपकर्णधारपद सांभाळणार आहे. संघाला फलंदाज ऋचा घोषच्या रुपाने एक नवीन खेळाडू मिळाली आहे. बंगालसाठी खेळणाऱ्या ऋचाला महिला चॅलेन्जर ट्रॉफीमध्ये तिच्या जबरदस्त खेळासाठी पुरस्कृत करण्यात आलं होतं. तिने महिला चॅलेन्जर ट्रॉफीमध्ये 36 चेंडूत 36 धावांची खेळी केली होती, ज्यात चार चौकार आणि एक षटकार होता (ICC Women’s T20 World Cup 2020).

ऋचा घोष व्यतिरिक्त संघात आणखी एका नवीन खेळाडूला संधी देण्यात आली आहे. हरयाणाच्या 15 वर्षीय शेफाली वर्माची भारतीय संघात निवड झाली आहे. केवळ 15 वर्षांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या शेफालीने जगभरातील क्रिकेट जाणकारांना आणि प्रेमींना आपल्या खेळाने अचंभित केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयने विश्वचषकासाठीही शेफालीवर विश्वास दाखवला आहे. शेफालीने आतापर्यंत 9 आँतरराष्ट्रीय T-20 सामन्यांमध्ये 142.30 च्या स्ट्राईक रेटने 222 धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या सर्वाधिक 73 आहेत.

भारतीय महिली संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार)
स्मृति मंधाना (उप कर्णधार)
शेफाली वर्मा
जेमिमा रोड्रिग्स
हरलीन देओल
दीप्ति शर्मा
वेदा कृष्णमूर्ती
ऋचा घोष
तानिया भाटिया
पुनम यादव
राधा यादव
राजेश्वरी गायकवाड़
शिखा पांडे
पुजा वस्त्राकर
अरुंधति रेड्डी

ICC महिला टी -20 विश्वचषकचा सातवा सीझन ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जाणार आहे. येत्या 21 फेब्रुवारी ते 8 मार्च 2020 या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशसह भारतीय संघाला ‘अ’ गटात स्थान देण्यात आलं आहे. भारतीय संघाचा पहिला सामना हा 21 फेब्रुवारीला सिडनी येथे यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवला जाणार आहे. यानंतर 24 फेब्रुवारीला बांगलादेश, 27 फेब्रुवारीला न्युझीलंड आणि 29 फेब्रुवारीला श्रीलंकाशी भारताचा सामना होईल. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होतील आणि एकूण 23 सामने खेळवले जातील.

T-20 विश्वचषकाच्या संघासोबतच निवड समितीने ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी 16 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. ही मालिका 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामध्ये नुजहत परवीनला 16 वी खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *