AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC WTC Points Table: ब्रिस्बेन कसोटी जिंकल्यामुळे टीम इंडियाची पत वधारली, वाचा नक्की काय झाले?

या ऐतिहासिक मालिका विजयामुळे टीम इंडियाने आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. | ICC WTC Points Table

ICC WTC Points Table: ब्रिस्बेन कसोटी जिंकल्यामुळे टीम इंडियाची पत वधारली, वाचा नक्की काय झाले?
| Updated on: Jan 19, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवण्याचा पराक्रम करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) ब्रिस्बेन कसोटीनंतर लगेचच एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताने ब्रिस्बेन कसोटीतील विजयासोबतच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. या ऐतिहासिक मालिका विजयामुळे टीम इंडियाने आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. (Team India grab top position Australia Drop in point table after win test series in australia)

या विजयामुळे भारतीय संघ टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. आयसीसीने टक्केवारीच्या आधारे क्रमांक ठरवण्याची पद्धत सुरु केल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयामुळे भारताच्या खात्यात 30 गुणांची भर पडली. त्यामुळे 430 गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे.

तर पहिल्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला आहे. या क्रमवारीत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

ब्रिस्बेनमध्ये पाचव्या दिवशी नेमकं काय घडलं?

ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला तेव्हा हा सामना अनिर्णीत राहील, असा अनेकांचा होरा होता. मात्र, शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजाराने (56) भारताच्या विजयाचा पाया रचायला सुरुवात केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य राहणे झटपट 24 धावा केल्या. राहणे माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या समीप नेवून ठेवले. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली. त्यानेच शेवटचा चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संबंधित बातम्या:

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला

Aus vs Ind 4th Test: ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणाला….

(Team India grab top position Australia Drop in point table after win test series in australia)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.