AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shafali Verma : वर्ल्डकप स्क्वॉड दूरच, रिझर्व्हमध्येही नव्हती शफाली वर्मा, दुखापतीमुळे पलटलं नशीब, भारताच्या विजयात सिंव्हाचा वाटा

Shafali Verma : वर्ल्डकप 2025 च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात बॅट आणि बॉल, दोन्हींनी चमकदार कामगिरी करणारी शफाली वर्मा, ही खरंतर सुरूवातील विश्वचषकातील भारतीय संघाचा भागही नव्हती. तिला राखीव खेळाडूंमध्येही स्थान देण्यात आले नव्हते. तरीही संघात स्थान मिळाल्यावर तिने उत्तम कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा बजावला.

Shafali Verma : वर्ल्डकप स्क्वॉड दूरच, रिझर्व्हमध्येही नव्हती शफाली वर्मा, दुखापतीमुळे पलटलं नशीब, भारताच्या विजयात सिंव्हाचा वाटा
शफाली वर्माची शानदार कागमिरीImage Credit source: social media
| Updated on: Nov 03, 2025 | 12:59 PM
Share

भारतीय महिला संघाने रविवारी शानदार कामगिरी करत 2025 च्या महिला वनडे वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव करोलं. टीम इंडियाने पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकत ही ट्रॉफी जिंकली असून इतिहास रचला. अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. भारताच्या विजयात सर्वच खेळाडूंची सरस कामगिरी होती, त्याचप्रमाणे शफाली वर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. या फायनल सामन्यात शेफालीने बॅट आणि बॉल, दोन्ही तळपवत दोन्हीने उत्कृष्ट कामगिरी केली. पण हीच शफाली वर्मा या विश्वचषकात टीम इंडियाचा भाग नव्हती, हे तुम्हाला माहीत आहे का ? खरंतर ती वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये नव्हती किंवा राखीव खेळाडूंमध्येही तिचा समावेश नवल्हता.

हो, हेच खरं आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या शफाली शर्माचा वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये समावेश नव्हता. तिच्या परफॉर्मन्समध्ये सातत्य नसल्यामुळे निवडकर्त्यांनी तिला संघातून वगळले होते. एवढंच नव्हे तर शफालीचा राखीव खेळाडूंच्या यादीतही समावेश नव्हता.

प्रतिका रावलची रिप्लेसमेंट म्हणून संघात आली

मात्र संघातील खेळाडू प्रतिका रावल जखमी झाली, तेव्हा शफाली वर्माचे नशीब चमकले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतिकाच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळेच तिला वर्ल्डकपच्या बाद फेरीच्या सामन्यांमधून बाहेर पडावे लागले आणि तिच्या जागी शफाली वर्माचा संघात समावेश करण्यात आला. अशाप्रकारे, शफाली वर्मा एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारताच्या एकदिवसीय संघात परतली. यापूर्वी, उपांत्य फेरीत, शेफाली फक्त 10 धावा करून बाद झाली होती, पण अंतिम फेरीत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात सिंव्हाचा वाटा

मात्र भारतीय संघाच झालेली निवड तिने सार्थ ठरवली. काल झालेल्या फायनल मॅचमध्ये अंतिम सामन्यात, शफाली वर्माने प्रथम फक्त 78 चेंडूत 7 चौकार आणि दोन षटकारांसह 87 धावांची धमाकेदार खेळी केली. त्यानंतर तिने गोलंदाजी करताना 2 बळी टिपले. शफालीने प्रथम सून लुस आणि नंतर मॅरिझाने कॅपला बाद केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?.
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर.
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर.
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन.
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'.
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?.
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?.
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?.