IND vs NZ : यू-टर्न वर यू-टर्न…कॅप्टन सूर्यकुमार यादव जे बोलला त्यावरुन पलटला, 30 दिवसात बदलला निर्णय
IND vs NZ : T20 वर्ल्ड कपला आता महिन्याभरापेक्षा पण कमी दिवस उरले आहेत. अशावेळी टीम मॅनेजमेंट अजूनही काही मुद्यांवर कंफ्यूज दिसतेय. कॅप्टन सूर्यकुमार यादवने काल एक स्टेटमेंट दिलं. त्यावरुन किती लवकर पलटला अशी चर्चा सुरु झालीय.

टी20 वर्ल्ड कप 2026 चे जवळ येत आहे. टीम इंडियाकडून सतत अपेक्षा वाढत आहेत. दीड वर्षांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने हा टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम हा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर जास्त जबाबदारी आहे. टुर्नामेंट इतकी जवळ आल्यामुळे टीम इंडिया आपल्या रणनितीवर स्पष्ट असेल अशी अपेक्षा आहे. पण असं दिसतय की, बॅटिंग ऑर्डरबद्दल आपल्या योजनेवर टीम अजूनही पूर्ण कॉन्फिडेंट नाहीय. म्हणूनच महिन्याभराच्या आत भारतीय कर्णधाराने आपलं स्टेटमेंट बदललं.
तुम्ही विचार करत असाल, सूर्यकुमार यादवने आपलं कुठलं स्टेटमेंट बदललं?. तो आधी काय बोललेला? आणि आता काय बोलला?. मंगळवारी 20 जानेवारील भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेतली. बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरु होत असलेल्या टी 20 मालिकेबद्दल त्याने प्रश्नांची उत्तर दिली. प्लेइंग 11 बद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, “जखमी तिलक वर्माच्या जागी इशान किशनचा टीममध्ये समावेश केला जाईल आणि तो दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल”
सूर्या काय म्हणाला?
स्वत:च्या बॅटिंग पोजिशनबद्दलही सूर्याने जे उत्तर दिल, त्याने अनेकांना आश्चर्य वाटेल. “भारतीय कर्णधाराने नंबर 3 ऐवजी नंबर 4 वर खेळणार असल्याची घोषणा केली. याचं कारण सांगताना सूर्यकुमार म्हणाला की, माझे आकडे नंबर 3 आणि नंबर 4 दोन्ही ठिकाणी चांगले आहेत. कदाचित चौथ्या नंबरवर अधिक चांगले आहेत. आम्हाला थोडं लवचिक रहायचं आहे”
त्याने ओवररेटेड म्हटलं होतं
पहिल्यांदा ऐकण्यात यात आश्चर्य वाटत नाही. टीम इंडियाने संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची ओपनिंगसाठी जोडी बनवली आहे. एका रायटी आणि एक लेफ्टी असं कॉम्बिनेशन आहे. अशावेळी हा विचार योग्य वाटतो. पण सूर्याच्या स्टेटमेंटची दखल घेणं यासाठी भाग पडतं कारण एक महिन्यापूर्वी तो या विरोधात होता. लेफ्ट-राइड कॉम्बिनेशने त्याने ओवररेटेड म्हटलं होतं.
लेफ्ट-राइट कॉम्बिनेशनला महत्व
गौतम गंभीर टीम इंडियाचे हेड कोच बनल्यापासून ते लेफ्ट-राइट कॉम्बिनेशनला महत्व देतात. 21 डिसेंबरला टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सूर्याने लेफ्ट-राइड कॉम्बिनेशबद्दल वेगळं म्हटलं होतं. त्यावेळी भारतीय कर्णधाराने तिलक वर्मा 3 नंबरवर फलंदाजी करणार असल्याच म्हटलं होतं. “आम्ही अशा पॉइंटवर आलो आहोत जिथे लेफ्ट-राइट कॉम्बिनेशन ओवररेटेड वाटतय” असं सूर्या म्हणाला होता. आता आम्ही ठरवलय की तिलक नंबर 3 वर आणि मी नंबर 4 वर खेळणार.
मग आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे
आता 30 दिवसांच्या आत टीम इंडियाचा कॅप्टन याच मुद्दावरुन यू-टर्न घेतोय. मग आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. हैराण होण्यापेक्षा चिंता वाढवणारी बाब ही आहे की, टीम मॅनेजमेंट बॅटिंग ऑर्डरबद्दल इतकी कंफ्यूज का आहे?. एका पॉलिसीवर कायम राहण्याचा निर्णय का घेत नाही?. टुर्नामेंटमध्ये याचा फटका बसू शकतो.
