AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार सूर्यकुमार यादवने खराब फॉर्मबाबत आपलं म्हणणं मांडलं, धावांचं गणित असं सोडवणार

भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 जानेवारीला होणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला सामोरं गेला. तेव्हा त्याने खराब फॉर्मबाबत आपलं म्हणणं मांडलं.

कर्णधार सूर्यकुमार यादवने खराब फॉर्मबाबत आपलं म्हणणं मांडलं, धावांचं गणित असं सोडवणार
कर्णधार सूर्यकुमार यादवने खराब फॉर्मबाबत आपलं म्हणणं मांडलं, धावांचं गणित असं सोडवणारImage Credit source: PTI
| Updated on: Jan 20, 2026 | 9:36 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी भारताची न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत चाचणी होणार आहे. टी20 मालिका 21 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पहिला सामना नागपूरमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमारच्या नेतृत्वात संघ सज्ज आहे. पण या मालिकेपूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. कारण त्याने मागच्या चार सामन्यात फक्त 34 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. कारण असाच फॉर्म राहिला तर त्याचा परिणाम टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर होऊ शकतो. असं असलं तरी संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास टाकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला आपला फॉर्म सिद्ध करणं भाग आहे. असं असताना त्याने आपलं म्हणणं मांडलं.

सूर्यकुमार यादवने पत्रकारांना सांगितलं की, त्याची फलंदाजी नेटमध्ये चांगली राहिली आहे. त्याचा परिणाम सामन्यातही दिसेल. पण त्याने आपल्या आक्रमक शैलीत कोणताही बदल करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच सूर्यकुमार मैदानात आल्यावर आक्रमक बाणा कायम ठेवेल हे मात्र स्पष्ट आहे.  इतकंच काय तर सूर्यकुमार यादवने फलंदाजीच्या क्रमाबाबतही स्पष्ट मत मांडलं आहे. संघाला गरज असेल तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. या दोन्ही स्थानावर सूर्यकुमार यादव खेळला आहे. त्यामुळे त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. पण आकडेवारी पाहिली तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव चांगला खेळला आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्याची फलंदाजी ठीक आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवने सांगितलं की, नेटमध्ये चांगली तयारी झाल्याचं दिसत आहे. लवकरच धावाही दिसतील. पण जर कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर पुन्हा मेहनत करणार. अभ्यास करून तितक्याच ताकदीने मैदानात उतरणार. सूर्यकुमार यादवची खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा आहे. कारण हा वर्ल्डकप भारतात होत आहे. त्यात गतविजेता असल्याने जेतेपद कायम राखण्याचं आव्हान आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.  वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील आव्हान भारत सहज पेलेल. पण खरी कसोटी बाद फेरीत असणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.