टीम इंडियाच्या जर्सीवर आता OPPO ऐवजी ‘हे’ नाव दिसणार

ओप्पोने (OPPO) मार्च 2017 मध्ये पाच वर्षांसाठी 1079 कोटी रुपयांमध्ये हे अधिकार विकत घेतले होते. पण हा करार कंपनीसाठी महागडा ठरल्याचं बोललं जातंय, ज्यामुळे बीसीसीआयशी बातचीत करुन दुसऱ्या कंपनीला अधिकार विकले जाणार आहेत.

टीम इंडियाच्या जर्सीवर आता OPPO ऐवजी 'हे' नाव दिसणार

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर लवकरच नवं नाव दिसणार आहे. चीनची मोबाईल कंपनी ओप्पोचं (OPPO) नाव सध्या भारतीय संघाच्या जर्सीवर आहे. ओप्पोने (OPPO) मार्च 2017 मध्ये पाच वर्षांसाठी 1079 कोटी रुपयांमध्ये हे अधिकार विकत घेतले होते. पण हा करार कंपनीसाठी महागडा ठरल्याचं बोललं जातंय, ज्यामुळे बीसीसीआयशी बातचीत करुन दुसऱ्या कंपनीला अधिकार विकले जाणार आहेत.

बंगळुरुची शिक्षण क्षेत्रातील ऑनलाईन टुटोरियल फर्म बायजूसाठी ओप्पो आपली जागा सोडणार आहे. टीम इंडिया मायदेशात होणाऱ्या आगामी मालिकेतच बायजू नाव असणारी जर्सी घालण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेची सुरुवात 15 सप्टेंबरपासून होणार आहे.

2017 मध्ये झालेला हा करार ओप्पोला महागडा ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे ओप्पो, बायजू आणि बीसीसीआय यांच्यात एका नव्या करारावर स्वाक्षरी केली जाईल.

बीसीसीआयमधील सूत्रांच्या माहितीनुसार, या करारात ओप्पोकडून मिळत होते तेवढेच पैसे बायजूकडूनही मिळतील. त्यामुळे बीसीसीआयला कोणताही तोटा सहन करावा लागणार नाही. हा करार 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहिल. बायजूची स्थापना केरळचे उद्योगपती बायजू रविंद्रन यांनी केली होती, ज्याची सध्याची किंमत 38 हजार कोटी रुपये आहे.

भारताचे आगामी दौरे

विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कार्यक्रम जाहीर झालाय. बीसीसीआयकडून सप्टेंबरपासून ते मार्च 2020 पर्यंतचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय. यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, वेस्ट इंडिज, झिम्बाम्ब्वे हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, झिम्बाम्ब्वे भारतीय दौऱ्यावर येण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण, झिम्बाम्ब्वे क्रिकेटवर आयसीसीने कारवाई केली आहे.

पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर येईल. भारत पुढच्या काही महिन्यांमध्ये मायदेशातच जास्तीत जास्त मालिका खेळणार आहे. बीसीसीआयकडून 5 कसोटी, 9 वन डे आणि 12 टी-20 सामन्यांचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

पहिला टी-20 सामना – 15 सप्टेंबर, धर्मशाला

दुसरा टी-20 सामना – 18 सप्टेंबर, मोहाली

तिसरा टी-20 सामना – 22 सप्टेंबर, बंगळुरु

पहिला कसोटी सामना – 2 ऑक्टोबर, विशाखापट्टणम

दुसरा कसोटी सामना – 10 ऑक्टोबर, रांची

तिसरा कसोटी सामना – 19 ऑक्टोबर, पुणे

बांगलादेशचा भारत दौरा

पहिला टी-20 सामना – 3 नोव्हेंबर, दिल्ली

दुसरा टी-20 सामना – 7 नोव्हेंबर, राजकोट

तिसरा टी-20 सामना – 10 नोव्हेंबर, नागपूर

पहिला कसोटी सामना – 14 नोव्हेंबर, इंदूर

दुसरा कसोटी सामना – 22 नोव्हेंबर, कोलकाता

वेस्ट इंडिजचा भारत दौरा

पहिला टी-20 सामना – 6 डिसेंबर, मुंबई

दुसरा टी-20 सामना – 8 डिसेंबर, तिरुवअनंतपुरम

तिसरा टी-20 सामना – 11 डिसेंबर, हैदराबाद

पहिला वन डे सामना – 15 डिसेंबर, चेन्नई

दुसरा वन डे सामना – 18 डिसेंबर, विशाखापट्टणम

तिसरा वन डे सामना – 22 डिसेंबर, कटक

झिम्बाम्ब्वेचा भारत दौरा (2020)

पहिला टी-20 सामना – 5 जानेवारी, गुवाहटी

दुसरा टी-20 सामना – 7 जानेवारी, इंदूर

तिसरा टी-20 सामना – 10 जानेवारी, पुणे

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (2020)

पहिला वन डे सामना – 14 जानेवारी, मुंबई

दुसरा वन डे सामना – 17 जानेवारी, राजकोट

तिसरा वन डे सामना – 19 जानेवारी, बंगळुरु

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (2020)

पहिला वन डे सामना – 12 मार्च, धर्मशाला

दुसरा वन डे सामना – 15 मार्च, लखनौ

तिसरा वन डे सामना – 18 मार्च, कोलकाता

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI