AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : जे दिसतय, चुकीच वाटतय ते ऋषभ पंतने सरळ बोलून दाखवलं, लॉर्ड्स टेस्ट आधी मोठं वक्तव्य

ENG vs IND : टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलनंतर आता ऋषभ पंतने एका गोष्टीबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली आहे. जे दिसतय, चुकीच वाटतय ते ऋषभ पंतने सरळ बोलून दाखवलं. लॉर्ड्स टेस्ट आधी ऋषभ पंतच्या या वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन अजून वादाला फोंडणी मिळू शकते.

ENG vs IND : जे दिसतय, चुकीच वाटतय ते ऋषभ पंतने सरळ बोलून दाखवलं, लॉर्ड्स टेस्ट आधी मोठं वक्तव्य
rishabh pant Image Credit source: PTI
| Updated on: Jul 10, 2025 | 9:26 AM
Share

इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट सीरीज दरम्यान टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतने एक मोठ स्टेटमेंट दिलं आहे. त्यावरुन एक नवीन वाद सुरु झालाय. दोन्ही टीम्समध्ये तिसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाकडून ऋषभ पंत पत्रकार परिषदेला आला होता. यावेळी ऋषभने टेस्ट सीरीजसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्यूक्स चेंडूवर प्रश्न उपस्थित केला.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्यूक्स चेंडूच्या गुणवत्तेवकर ऋषभ पंतने कठोर शब्दात टीका केली आहे. तो म्हणाला की, “याआधी मी कधी, चेंडू इतक्या लवकर खराब होताना आणि नरम होताना पाहिलेला नाही. या सीरीजमध्ये लवकर चेंडूचा आकार बिघडणं आणि नरम पडणं एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाज दोघांसमोर आव्हान निर्माण होतय. सीरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेकदा अंपायरकडे चेंडू बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर चेंडू बदलण्यात आला” याआधी शुबमन गिलने एजबेस्टन टेस्ट जिंकल्यानंतर ड्यूक्स बॉलच्या वापरावर प्रश्न विचारला होता.

एक फलंदाज म्हणून तुम्हाला या परिस्थितीश जुळवून घ्यावं लागतं

“चेंडू मोजण्याचा गेज (मग, तो ड्यूक्स असो किंवा कूकाबुरा) एक सारखाच असला पाहिजे. पण चेंडू छोटा असता, तर चांगलं झालं असतं. चेंडूमुळे खूप त्रास होतोय. माझ्यामते ही एक मोठी समस्या आहे. कारण चेंडूचा आकार बिघडतोय. मी याआधी असं पाहिलेलं नाही. यामुळे खेळाडूंना त्रास होतोय. चेंडू नरम झाल्यानंतर कधी-कधी मूवमेंट मिळत नाही. पण चेंडू बदलल्यानंतर मदत मिळते. एक फलंदाज म्हणून तुम्हाला या परिस्थितीश जुळवून घ्यावं लागतं. मला वाटतं क्रिकेटसाठी हे चांगलं नाही” असं ऋषभ पंत पत्रकार परिषदेत म्हणाला.

विकेट काढताना अडचणी येतात

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या एंडरसन-तेंदुलकर ट्रॉफी सीरीजमध्ये पहिल्या दोन कसोटी सामन्यात ड्यूक्स चेंडूच्या गुणवत्तेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण झालय. गोलंदाजांना नव्या चेंडूने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मदत मिळते. पण त्यानंतर चेंडू नरम होतो. आकार बिघडतो. त्यामुळे गोलंदाजांना विकेट काढताना अडचणी येतात.

हा चेंडू बनवणाऱ्या कंपनीचे मालक काय म्हणाले?

यावर हा चेंडू बनवणाऱ्या कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया यांनी उत्तर दिलं आहे. “आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की, बॅट आता बदलेल्या आहेत. बॅट अजून मजबूत झालीय. फक्त बॅटच नाही, खेळाडू सुद्धा दणकट आहेत. म्हणूनच ते सुरुवातीपासून सिक्स मारतात. मी जर चेंडू जास्त हार्ड बनवला, तर बॅट तुटू शकते. चेंडू बनवताना आम्हाला खेळाचे नियम लक्षात घ्यावे लागतात” असं दिलीप जाजोदिया म्हणाले.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.