IND vs NZ: टीम इंडिया बनणार जगातील नंबर 1 वनडे टीम! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत करावा लागेल असा पराक्रम

| Updated on: Nov 24, 2022 | 9:11 AM

टीम इंडिया जगात नंबर 1 होण्याच्या वाटेवर, परंतु न्यूझिलंडच्या मालिकेत अशी कामगिरी करावी लागेल

IND vs NZ: टीम इंडिया बनणार जगातील नंबर 1 वनडे टीम! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत करावा लागेल असा पराक्रम
ind vs nz
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई : टीम इंडिया (IND) आयसीसीच्या (ICC)आकडेवारीत एक नंबरला आहे. परंतु टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसीच्या आकडेवारीत एक नंबरला राहायचे असल्यास न्यूझिलंडविरुद्धची (NZ) मालिका 3-0 ने जिंकावी लागेल. तसेच टीम इंडिया कसोटीमध्ये सुध्दा दोन क्रमांकावर आहे. उद्यापासून टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु होत आहे.

उद्या टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध पहिली एकदिवसीय मॅच ऑकलॅडच्या मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता मॅच सुरु होईल. धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एकदिवसीय मॅचमध्ये न्यूझिलंड टीम आकडेवारीत एक नंबरला आहे. न्यूझिलंड टीमकडे 114 गुण आहे. त्याचबरोबर टीम इंडियाकडे 112 गुण आहेत. समजा टीम इंडियाने न्यूझिलंडचा 3-0 असा पराभव केल्यास, टीम इंडियाकडे अधिक गुण होतील आणि टीम इंडिया एक नंबरला जाईल.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड टीम

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.