India Vs South Africa: टीम इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेत राहणार बायो बबलमध्ये; मालिकेची जोरदार तयारी

India Vs South Africa: टीम इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेत राहणार बायो बबलमध्ये; मालिकेची जोरदार तयारी
राहुल द्रविड आणि खेळाडू.

टीम इंडिया 16 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. भारताचा पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 12, 2021 | 12:55 PM

मुंबईः कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूच्या सावटात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिथे एक कसोटी मालिका आणि एक एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेत बायो बबलमध्ये राहणार आहे.

आज मुंबईत एकत्र

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यासाठी टीम इंडिया आज मुंबईत एकत्र येत आहे. येथे चार दिवस खेळाडूंना क्वारंटाईन केले जाईल. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. भारताचा पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.

तीन कसोटी, तीन एकदिवसीय

एकीकडे दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या ओमिक्रॉन विषाणूने जगभर भीती निर्माण केली आहे. त्यातच हे क्रिकेट सामने होत आहेत. त्यामुळे चिंता आहे. विशेषतः याबद्दल अनेक अफवाही पसरल्या आहेत. मात्र, बीसीसीआयने या अफवांचे खंडन केले आहे. सोबतच या दौऱ्यात तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील, अशी माहिती दिली आहे.

एकदिवसीय संघाची घोषणा नाही

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहचल्यानंतर सर्व खेळाडूंना हा दौरा संपेपर्यंत बायो बबलमध्ये रहावे लागणार आहे. त्यात जवळपास 50 दिवस तरी खेळाडूंचा मुक्काम येथे असेल. विशेष म्हणजे अजून एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे जे खेळाडू कसोटी खेळणार आहेत, त्यांचेच प्रयाण होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने 18 जणांच्या संघाची निवड केली आहे. त्यात विराट कोहली कर्णधार, तर रोहित शर्मा उपकर्णधार असेल. खराब फॉर्ममुळे अजिंक रहाणेचे उपकर्णधारपद रोहितकडे देण्यात आले आहे.

असे होतील सामने

टीम इंडियाचा पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सेंचुरियनमध्ये सुरू होईल. दुसरा सामना 3 जानेवारी रोजी जोहान्सबर्ग आणि तिसरा सामना 11 जानेवारी रोजी केपटाऊनमध्ये होणार आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका 19 जानेवारीपासून सुरू होईल. 21 जानेवारी आणि 23 जानेवारी रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना होईल. रोहित शर्माला टी-20 सोबत एकदिवसीय सामन्याचा कर्णधार करण्यात आल्याची घोषणा यापूर्वीच बीसीसीआयने केली आहे. त्यामुळे विराट कोहली फक्त कसोटी सामन्याचा कर्णधार राहणार आहे.

रोहितचा व्हिडिओ

रोहित शर्माने सोशल मीडियावर एक नेट प्रॅक्टीसचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांनी मोठ्या मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यात त्रिशतक ठोकावे, अशी अपेक्षा एका चाहत्याने व्यक्त केली आहे.

इतर बातम्याः

तर गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं: छगन भुजबळ

Sharad Pawar Birthday PHOTO : 81 वर्षांचे पवार, 10 निर्णायक प्रसंग

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें