England Tour India 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिका इंग्लंडच्या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक : जयवर्धने

इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून (england tour india 2021) कसोटीने मालिकेने होणार आहे.

England Tour India 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिका इंग्लंडच्या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक : जयवर्धने
इंग्लंड क्रिकेट टीम

कोलंबो : श्रीलंकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत करुन इंग्लंडने 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकली. या मालिकेत इंग्लंडच्या डॉमनिक बेस (dom bess) आणि जॅक लीच (jack leach) या फिरकीपटू जोडीने धमाकेदार कामगिरी केली. या दोघांनी या मालिकेत प्रत्येकी अनुक्रमे 12 आणि 10 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला नमवल्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यावर (England Tour India 2021) येणार आहे. “टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिका या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक असेल”, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने (Mahela jayawardene) दिली आहे. (Test series against Team India will be challenging for the spin duo of Dominic Bess and Jack Leach said Mahela Jayawardene)

जयवर्धने काय म्हणाला?

“ही कसोटी मालिका फार चुरशीची असेल. लीच आणि बेस या दोघांसाठी ही टेस्ट सीरिज चॅलेंजिग असेल. परदेशात जावून कसोटी मालिका जिंकायची असते, यालाच क्रिकेट म्हणतात”, अशी प्रतिक्रिया जयवर्धनने दिली. तो स्काय स्पोर्ट्ससोबत बोलत होता.

“या फिरकीपटू जोडीला श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेत अनुभव मिळाला. पण भारतात या दोघांना तगडं आव्हान असेल. तसेच बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरच्या पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. स्टोक्सच्या रुपात इंग्लंडकडे गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिका सार्थपणे बजावणारा खेळाडू आहे. तर जोफ्रा आर्चर आपल्या गोलंदाजीच्या वेगाने नक्कीच इंग्लंडसाठी विकेट्स घेईल. या दोघांची एंट्री इंग्लंडसाठी फायदेशीर ठरेल”, असा विश्वास जयवर्धनेने व्यक्त केला. स्टोक्स आणि आर्चर या दोघांना श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून कसोटीने मालिकेने होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. या सीरिजमधील पहिल्या 2 सामन्यांसाठी दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी मालिकेनंतर 5 मॅचेसची टी 20 सीरिज खेळण्यात येणार आहे. तर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सांगता होणार आहे.

“टीम इंडिया कसोटी मालिका जिंकणार”

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका टीम इंडिया 3-1 किंवा 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकेल, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने केली आहे.

संबंधित बातम्या :

Maiden Over | बापू नाडकर्णींकडून सलग 21 ओव्हर मेडन, सर्वाधिक मेडन टाकणारा गोलंदाज कोण?

England Tour India 2021 | इंग्लंडच्या या खेळाडूचा भारताला धोका, चष्मा घालून दांडी गुल करण्यात माहिर!

Sri Lanka vs England, 2nd Test | जो रुटची विक्रमाला गवसणी, 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

(Test series against Team India will be challenging for the spin duo of Dominic Bess and Jack Leach said Mahela Jayawardene)

Published On - 4:20 pm, Tue, 26 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI