Badminton Player | बँडमिंटनपटूसाठी हायकोर्ट तोडणार रुल! 15 ऑगस्ट रोजी सुनावणार फैसला, काय आहे हे आंतरराष्ट्रीय प्रकरण?

Badminton Player | बँडमिंटनपटूसाठी हायकोर्ट स्तःचाच नियम तोडणार आहे, काय आहे हे प्रकरण? आणि कोणी केलाय या खेळाडूवर अन्याय?

Badminton Player | बँडमिंटनपटूसाठी हायकोर्ट तोडणार रुल! 15 ऑगस्ट रोजी सुनावणार फैसला, काय आहे हे आंतरराष्ट्रीय प्रकरण?
खेळाडूवरील अन्यायाप्रकरणात सुनावणी
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 13, 2022 | 10:44 AM

Badminton Player | औरंगाबादमधील बँडमिंटन खेळाडूसाठी (Aurangabad Badminton Player) आता हायकोर्ट स्वतःचाच सुट्टीच्या दिवशी कामकाज न करण्याचा नियम तोडणार आहे. एका खेळाडूच्या स्वप्न पुर्तीसाठी 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टीच्या (National Holiday) दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात(Bombay High Court of Aurangabad Bench) विशेष सुनावणी होणार आहे. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी तसे तर सर्वच सरकारी कार्यालये बंद असतात. त्याला न्याययंत्रणा ही अपवाद नाही. मात्र या नियमाला औरंगाबाद खंडपीठ बगल देणार आहे. एका खेळाडूवरील अन्याय त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. दहशतवादी, कर्जबुडव्या लोकांसाठी न्यायालय रात्री पण सुनावणी घेतात असा रोष अनेकदा माध्यमातून आणि सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केला जातो. मात्र यावेळी एका खेळाडूने त्याच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असता, 15 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारला याप्रकरणात म्हणणे मांडण्याचे ही निर्देश देण्यात आले आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहुयात.

कोणी दाखल केली याचिका

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र शहरातील राष्ट्रीय बॅंडमिंटनपटू प्रथमेश प्रकाश कुलकर्णी याने ही याचिका दाखल केली आहे. त्याला बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या कारभाराचा फटका बसला आहे. मागील काही तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चमकत आहे त्याला फेडरेशनच्या कार्यालयातील बाबुंच्या लहरीपणाचा फटका बसला. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय मानांकनात 55 वरून 23 व्या क्रमांकावर मजल मारणाऱ्या मेहनती खेळाडूला आता बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या चुकीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावे लागत आहे. औरंगाबाद खंडपीठात त्याने अन्यायाविरोधात दाद मागितली आहे.

महिला संघात केला समावेश

30 ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी त्याने रितसर अर्ज दाखल केला होता. त्याचा समावेश करण्यात आला, पण तोही महिला संघात. त्याने ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर ही त्याचे नाव काही लवकर हटवण्यात आले नाही. त्याने अर्जफाटे केल्यानंतर त्याचे नाव महिला संघातून वगळण्यात आले. पण पुरष संघात त्याला प्रवेश नाकारण्यात आला. कुलकर्णी याला बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या कारभाराचा फटका बसला.

 

हे सुद्धा वाचा

15 ऑगस्ट रोजी सुनावणी

प्रथमवेशचे नाव महिला यादीतून हटविले परंतु पुरूषांच्या यादीत समाविष्ट केले नाही. याविरोधात त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. अॅड. अमोल जोशी यांनी राष्ट्रीय मानांकन 23 असताना खेळाडूला फेडरेशनच्या चुकीचा फटका सहन करावा लागत आहे, असा मुद्दा मांडला. अत्यंत मेहनतीतून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. बॅडमिंटन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या अखत्यारित असल्याने यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांना मत मांडायचे निर्देश दिले. कोणत्या ही स्थितीत वादी प्रतिवादींनी खंडपीठात हजर राहावे असे आदेश देण्यात आले आहे. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अरूण पेडणेकर यांच्या खंडपीठासमोर 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता सुनावणी होणार आहे. केंद्राचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांना सर्व माहितीसह हजर राहण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें