जंटलमन गेममध्ये या क्रिकेटर्संना दारुची चटक, या पठ्ठ्याने तर नशेतच ठोकले शतक, तडाखेबंद फटकेबाजीने प्रेक्षक मंत्रमुग्ध
Cricketers fond of Alcohol : क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जातो. पण काही क्रिकेटर्स मद्यप्रेमी आहेत. काहींनी तर दारुचा एक घोट रिचवून मैदान गाजवले आहे. कोण आहेत ते खेळाडू?

क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जातो. मैदानावर खेळाडू रणनीतीने उतरतात. त्यांना समोरच्या संघाला कोंडीत पकडायचे असते. ते मैदानावर अलर्ट मोडवर असतात. पण काही खेळाडू मद्यप्रेमी आहेत. दारुने त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम केला आहे. पण एखाद्या खेळाडूने नशेत मैदान गाजवले तर तुमचा विश्वास बसेल का? पण दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शल गिब्जने नशेतच फलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. त्याने त्या सामन्यात 175 धावांचा डोंगर उभारला होता, हे वाचून आता काहींची रिचवलेली दारु सुद्धा उतरली असेल, नाही का?
1- हर्शल गिब्स
12 मार्च 2006 रोजी हर्शल गिब्सने ऑस्ट्रेलियाविरोधात सामान्यात 435 धावांचा पाठलाग करताना 111 चेंडूवर 157.66 च्या स्ट्राईक रेटनुसार 175 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्यांनी मैदानावर चौफेर फटेकबाजी केली होती. त्याने 21 चौके आणि 7 छक्के ठोकले होते. हा सामना आफ्रिकेने जिंकला होता. हर्शल गिब्स याने अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता.
सामन्यानंतर हर्शलने स्वतः आपण नशेत सामना खेळल्याचा खुलासा केला होता. गिब्सने त्याची आत्मकथा ‘टू द पॉइंट: द नो होल्ड्स बार्ड’ मध्ये खुलासा केला की, ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यापूर्वी रात्री आपण खूप दारू पिलो होतो. सकाळी दारूची झिंग काही उतरली नाही. जेव्हा मैदानावर गेलो तेव्हा पण मी नशेतच होतो.
2- विनोद कांबळी
विनोद कांबळी हा भारताचा जबरदस्त फलंदाज होता. 1993 मध्ये इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्यात त्याने द्विशतकी खेळी खेळली होती. त्याच्या कामगिरीचे कौतुक झाले होते. त्यावेळी कांबळी हा केवळ 21 वर्षांचा होता. कांबळीचे क्रिकेटच्या मैदानाशी नाते फार काळ टिकले नाही. कांबळीने अनेकदा सांगितले आहे की, त्याला दारुचे व्यसन आहे. मध्यंतरी त्याच्या एका व्हिडिओने पण खळबळ उडवली होती.
3- अँड्रयू सायमंड्स
ऑस्ट्रेलिया क्रिकेटर अँड्रयू सायमंड्स याने अनेकदा मैदान गाजवले आहे. सायमंड्स हा ऑलराऊंडर खेळाडूंपैकी एक होता. बिनधास्त आणि स्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखल्या जातो. त्यालाही दारुचे व्यसन होते. सायमंड्सच्या खुलाशानुसार, तो एकावेळी पूर्ण दारू बोटल रिचवत असे.
4- जेसी राइडर
इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसी रायडर याला पण दारुची वाईट सवय होती. दारुने त्याच्या करिअरवर मोठा परिणाम केला. तो चुकीच्या मार्गावर पोहचला. 2013 मध्ये त्याच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर तो अनेक दिवस कोमात गेला होता. तो काही दिवसांनी मैदानावर पुन्हा परतला आणि त्याने शतक ठोकले. पण तो दारुचे व्यसन सोडू शकला नाही.
5- जेम्स फॉल्कनर
क्रिकेटमधील दिग्गजांमध्ये जेम्स फॉल्कनरचे नाव चाहते सहजा सहजी विसरत नाही. डेथ ओवर स्पेशलिस्ट म्हणून जेम्स फॉल्कनर ओळखल्या जातो. 2015 मध्ये दारू पिऊन कार चालवताना तो पकडल्या गेला होता. ऑस्ट्रेलिया संघाने त्याच्यावर बंदी आणली आणि पुढे त्याचे करिअर थांबले.
