AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आयपीएल आजपासून सुरु होत असताना एमएस धोनीबद्दल आली वाईट बातमी

IPL 2026 : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगच्या सीजनला आजपासून सुरुवात होत आहे. पण त्याआधी चाहत्यांचा हिरमोड करणारी एक बातमी आहे. एमएस धोनी या स्पर्धेच मुख्य आकर्षक आहे. सीएसके आणि एमएस धोनी हे आयपीएलच्या स्टार्ट पासून बनलेलं समीकरण आहे.

IPL 2026 : आयपीएल आजपासून सुरु होत असताना एमएस धोनीबद्दल आली वाईट बातमी
IPL 2026 CSK MS Dhoni
| Updated on: Mar 28, 2026 | 2:05 PM
Share

आयपीएल 2026 ला आजपासून सुरुवात होत आहे. हा 19 वा सीजन आहे. टुर्नामेंट आजपासून सुरु होत असताना फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. खरंतर असं काही घडेल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. महेंद्र सिंह धोनी हा दरवर्षी होणाऱ्या आयपीएल टुर्नामेंटचं मुख्य आकर्षण असतो. तो चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आहे. एमएस धोनी आयपीएलमधील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीय. धोनीला दुखापत झालीय. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये सुरुवातीचे दोन आठवडे तो खेळू शकणार नाहीय. त्यामुळे CSK ला धोनी शिवायचं मैदानावर उतरावं लागेल. सीएसके आणि एमएस धोनी हे आयपीएलच्या स्टार्ट पासून बनलेलं समीकरण आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून आज 28 मार्चला सकाळी अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलं. त्यात धोनीच्या दुखापतीची माहिती देण्यात आली आहे.

एमएस धोनी स्ट्रेनच्या समस्येचा सामना करतोय. तो रिहॅबिलटेशन प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये सुरुवातीचे दोन आठवडे त्याला बाहेर रहावं लागेल” असं csk कडून सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. धोनीची दुखापत ही CSK आणि त्यांच्या फॅन्ससाठी मोठा झटका आहे. कारण धोनी फक्त एक सामना नाही, तर पुढचे दोन आठवडे CSK साठी मैदानावर उतरु शकणार नाहीय.

धोनी कधी परतणार?

धोनी 2 आठवडे 14 दिवस बाहेर राहणार असेल तर तो कमीत कमी 3 सामने खेळू शकणार नाही. सीएसकेचा पहिला सामना 30 मार्चला गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. त्यानंतर पुढचा सामना 3 एप्रिलला चेन्नईत पंजाब किंग्स विरुद्ध होईल. टीम आपला पाचवा सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 5 एप्रिलला आपल्या घरच्या मैदानावर खेळेल. धोनी 11 एप्रिलला होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात खेळू शकतो.

सर्जरी सुद्धा झाली होती

धोनी मागच्या दोन सीजनपासून फिटनेस समस्येचा सामना करत आहे. गुडघे दुखापतीचा सामना त्याला करावा लागला आहे. अनेकदा तो गुडघ्याला आईसपॅक बांधून खेळताना दिसतो. 2024 च्या सीजननंतर त्याच्या गुडघ्यावर सर्जरी सुद्धा झाली होती. वयोमानानुसार, त्याच्या टीममधील स्थानावर सुद्धा अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. धोनीने स्वत:बद्दलच फिट ठेवणं एक चॅलेंज असल्याचं म्हटलं होतं.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ