Vaibhav Suryavanshi : एकटा वैभव सूर्यवंशी 24 फलंदाजांवर पडला भारी, या दोन बाबतीत तुलनाच नाही होऊ शकत
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंडमध्ये खेळतोय. प्रत्येक सामन्यानंतर तो एक नवीन उंची गाठतोय. U19 सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात फक्त 14 धावांनी त्याचं शतक हुकलं. पण त्याच्या धुवाधार फलंदाजीने नवीन आकडे जोडले जात आहेत. या सीरीजमधील 24 फलंदांजापेक्षा तो दोन पावलं पुढे आहे.

भारत आणि UAE च्या पिचेसवर वैभव सूर्यवंशीने आपला दबदबा दाखवून दिलाय. आज जगभरातील क्रिकेटचे दिग्गज त्याचं कौतुक करतायत. आता 14 वर्षाच्या वैभवने इंग्लंडच्या पीचेसवर कमाल केलीय. तिथल्या वातावरणात परफॉर्म करुन दाखवलय. असं करताना त्याने 25 फलंदाजांमध्ये आपला दबदबा सिद्ध केलाय. वैभव सूर्यवंशीने दाखवून दिलय उर्वरित 24 फलंदाज त्याच्यासमोर टिकत नाहीत. वैभव त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहे.
सध्या भारताची अंडर 19 टीम सुद्धा इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या सीरीजमध्ये वैभव सूर्यवंशी भारताच्या अंडर 19 टीमचा भाग आहे. दोन्ही टीम्समध्ये पाच सामन्यांची सीरीज सुरु आहे. पहिले तीन सामने झालेत. या तीन सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या 25 फलंदाजांनी क्रीजवर आपली क्षमता दाखवून दिली. यात एक वैभव सूर्यवंशी होता. पण या सगळ्यांमध्ये वैभव सूर्यवंशीने जे कौशल्य दाखवलं, ते इतरांमध्ये नाहीय.
अशी कामगिरी करणारा वैभव एकमेव
वैभव सूर्यवंशीच्या ज्या क्षमतेबद्दल आपण बोलतोय, ती सिक्स आणि स्ट्राइक रेटशी संबंधित आहे. पहिल्या तीन सामन्यानंतर सीरीजमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 25 फलंदाजांचा स्ट्राइक रेट किंवा सिक्सची संख्या पाहिली, तर वैभवचे आकडे इतरांपेक्षा वेगळे आहेत. वैभव सूर्यवंशी एकमेव फलंदाज आहे, ज्याची अंडर 19 सीरीजमधील सिक्सची संख्या डबल आहे. 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट असलेला एकमेव फलंदाज आहे.
वैभवनंतर कोणाचा नंबर येतो?
अंडर 19 वनडे सीरीजच्या पहिल्या तीन सामन्यातच वैभव सूर्यवंशीने मारलेल्या सिक्सची संख्या 17 आहे. इंग्लंडचा थॉमल रियू 9 सिक्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचाच इसाक अहमद 6 सिक्ससह तिसऱ्या नंबरवर आहे. स्ट्राइक रेटच्या बाबतीत सुद्धा अंडर 19 वनडे सीरीजच्या पहिल्या तीन सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी नंबर वन आहे. वैभव सूर्यवंशीने 3 सामन्यात 213.09 च्या स्ट्राइक रेटने 179 धावा केल्या आहेत. वैभवनंतर इंग्लंडच्या थॉमस रियूचा नंबर येतो. त्याचा स्ट्राइक रेट 155.88 आहे.
