AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशी 21 व्या वर्षी क्रिकेटमधून रिटायर होईल, या दिग्गज क्रिकेटरचा खळबळजनक दावा, सांगितलं धक्कादायक कारण

इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटरने भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीबद्दल मोठं भाकीत केलं आहे. वैभव सूर्यवंशी वयाच्या 21 व्या वर्षी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेईल असं त्याने म्हटलं आहे. सध्या वैभव सूर्यवंशी आपल्या फलंदाजीमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

वैभव सूर्यवंशी 21 व्या वर्षी क्रिकेटमधून रिटायर होईल,  या दिग्गज क्रिकेटरचा खळबळजनक दावा, सांगितलं धक्कादायक कारण
Vaibhav SuryavanshiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 07, 2026 | 3:52 PM
Share

यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये (IPL 2026) स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आपल्या फलंदाजीने धमाल उडून दिली आहे. समोर कोणताही गोलंदाज असो, वैभव प्रचंड आक्रमक खेळ खेळतो. तो गोलंदाजांवर तुटून पडतो. त्यामुळे गोलंदाजांमध्ये देखील वैभव सूर्यवशीने आपल्या बॅटने चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. वैभव सूर्यवशी आयपीएलच्या या हंगाममध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. वैभव सूर्यवंशी सध्या ज्या आक्रमकपणे बॅटिंग करत आहे, ते पाहाता हा अवघ्या 15 वर्षांचा खेळाडू जगाच्या नजरेत आला नसता तरच नवल. सध्या जगभरात वैभव सूर्यवंशीची चर्चा सुरू आहे. अनेक दिग्गज खेळाडू देखील वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचे फॅन झाले आहेत.

आता एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे इंग्लंडच्या काही माझी दिग्गज खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीच्या रिटायरमेंटबाबत काहीशा गमतीशीर अंदाजामध्ये भाकीत केलं आहे. ‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये बोलताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, फिल टफनेल आणि आलिस्टेयर कुक तसेच डेव्हीड लॉयड यांनी वैभव सूर्यवंशीच्या रिटायरमेंटबाबत मोठं भाकीत केलं आहे. या पॉडकास्टमध्ये ते वैभव सूर्यवंशी आणि आयपीएलबाबत बोलत होते. यावेळी इंग्लंडच्या या दिग्गज खेळांडूकडून वैभव सूर्यवंशीचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं. यावेळी बोलताना मायकल वॉन म्हणाला की आयपीएलमध्ये सर्वात फास्ट शतकाचा विक्रम सध्या तरी ख्रिस गेलच्या नावावर आहे, त्याने 30 बॉलमध्ये शतक केलं होतं. मात्र वैभव सूर्यवंशीने आताच 35 बॉलमध्ये आपलं शतक केलं आहे. एवढंच नाही तर सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड अभिषेक शर्माच्या नावावर आहे, त्याने 2024 मध्ये 42 सिक्स मारले होते. मात्र या हंगामात वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत 37 सिक्स मारले आहेत. त्यामुळे हे रेकॉर्ड देखील धोक्यात आहे.

पुढे समजा वैभवने रिलिज होऊन आयपीएलमध्ये आपली बोली लावली तर त्याला किती पैसे मिळू शकतात? यावर देखील चर्चा झाली. यावर बोलताना कुक म्हणाला की त्याला राजस्थान रॉयल रिलिजच करणार नाही. तो लवकरच टीम इंडियामध्ये खेळताना देखील दिसेल. याचदरम्यान फिल टफनेल यांनी काहीशा गमतीच्या सुरात म्हटलं की वयाच्या 21 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीकडे एवढा पैसा असेल की तो आरामात रिटायरमेंट घेईल.

Follow Us
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....
चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमुळे राजकीय....
चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमुळे राजकीय.....
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत भुजबळांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत भुजबळांचे मोठे विधान.
मोदींच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण; ऑपरेशन सिंदूर वरून राऊतांची टीका
मोदींच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण; ऑपरेशन सिंदूर वरून राऊतांची टीका.
'बंगाल आणखी पेटलं पाहिजे, हिच मानसिकाता...' संजय राऊतांचा भाजपवर हल्ला
'बंगाल आणखी पेटलं पाहिजे, हिच मानसिकाता...' संजय राऊतांचा भाजपवर हल्ला.
भाजप अॅक्शन मोडमध्ये; नगरसेवकांनी पक्षशिस्त न पाळल्यास निधीला कात्री
भाजप अॅक्शन मोडमध्ये; नगरसेवकांनी पक्षशिस्त न पाळल्यास निधीला कात्री.
पुन्हा पंजाबमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसशी संबंधित लोक..
पुन्हा पंजाबमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसशी संबंधित लोक...
बापच बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा, मामेभावाने नको ते केलं
बापच बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा, मामेभावाने नको ते केलं.