Virat Anushka Daughter: विरुष्काच्या बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

विराट कोहलीच्या भावाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत लहान बाळाचे पाय दिसत आहेत. | Virat Anushka Daughter

Virat Anushka Daughter: विरुष्काच्या बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushaka Sharma) यांना कन्यारत्न प्राप्त झाले. विराट कोहलीने सोमवारी ट्विटवरून ही गोड बातमी दिली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो विरुष्काच्या बाळाचा असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, विराट कोहलीच्या भावाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत लहान बाळाचे पाय दिसत आहेत. ‘Happiness overboard… Angel in th house’ अशी कॅप्शन या फोटोसोबत लिहली आहे. मात्र, हा फोटो नक्की विरुष्काच्याच बाळाचा आहे का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. (Virushka baby girl first Photo viral on social Media)

View this post on Instagram

A post shared by Vikas Kohli (@vk0681)

‘त्या’ ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न

अनुष्का शर्माला मुलगी होणार असल्याची भविष्यवाणी काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाने केली होती. विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार असल्याचे या ज्योतिषाने सांगितले होते. ही भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे.

मुलीला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवणार

काही दिवसांपूर्वी व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्मा हिने आपल्या मुलीला काही दिवस प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवणार असल्याचे सांगितले होते. विराट आणि मी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. आम्हाला आमच्या बाळाला सोशल मीडियाच्या जंजाळात गुंतवायचे नाही. त्यामुळे आम्ही बाळाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अवघड असले तरी आम्ही या निर्णयाचे पालन करण्याचा प्रयत्न करु, असे अनुष्काने म्हटले होते.

संबंधित बातम्या:

Virat Anushka Daughter | विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

विराट कोहलीला मुलगी होणार! वाचा कुणी आणि कुठल्या आधारे केला दावा

‘त्या’ ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न

(Virushka baby girl first Photo viral on social Media)

Published On - 10:17 am, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI