कोहलीने एकाच सामन्यात गांगुली आणि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ सचिन बाकी

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |

Updated on: Aug 12, 2019 | 8:47 AM

भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळताना एकाचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा विक्रम मोडला. कोहलीने रविवारी (11 ऑगस्ट) आपल्या शानदार खेळीच्या जोरावर मियांदादाचा वेस्टइंडीजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

कोहलीने एकाच सामन्यात गांगुली आणि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ सचिन बाकी

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळताना एकाचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा विक्रम मोडला. कोहलीने रविवारी (11 ऑगस्ट) आपल्या शानदार खेळीच्या जोरावर मियांदादाचा वेस्टइंडीजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धाव करण्याच्या यादीत देखील त्याने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

मियांदादने वेस्टइंडीजविरुद्ध सर्वाधिक 1 हजार 930 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम कोहलीच्या नावे झाला आहे. कोहलीने रविवारी क्वींस पार्क ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 19 धावा बनवताच हा विक्रम केला. मियांदादाने 2 वेळा विश्वविजेत्या राहिलेल्या इंडिजविरुद्ध 64 डावांमध्ये ही धावसंख्या उभी केली होती. कोहलीने केवळ 34 डावांमध्येच हा विक्रम केला. या यादीत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू के. मार्क वॉ 1 हजार 708 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सौरभ गांगुलीचाही विक्रम मोडीत

विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत माजी कर्णधार सौरभ गांगुलीला देखील मागे टाकले आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये (300 खेळी) 11 हजार 363 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने गांगुलीलाही मागे टाकले. त्याने आपल्या 238 व्या सामन्यात गांगुलीचा विक्रम मोडला. कोहलीला या सामन्याआधी गांगुलीच्या पुढे जाण्यासाठी 78 धावांची गरज होती. कोहलीने या सामन्यामध्ये शानदार 120 धावांची खेळी करत गांगुलीचा हा विक्रम मोडला.

कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 8 व्या स्थानावर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 18 हजार 426 धावांसह सर्वोच्च स्थानी आहे. श्रीलंकाचा कुमार संगकारा 14 हजार 234 धावांसह दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग 13 हजार 704 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 59 धावांनी पराभव

भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा हा सामना 59 धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने इंडिजसमोर 279 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे वेस्ट इंडिजला 46 षटकांमध्ये 270 धावांचं लक्ष्य मिळालं. याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजला 42 षटकात सर्वबाद केवळ 210 धावाच करता आल्या.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI