AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसऱ्या टी-20 मध्ये भारताचा पराभव, धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी करण्याची कोहलीची संधी हुकली

तिसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवामुळे कोहलीला महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी करण्यात अपयश आलं आहे. (Virat Kohli MS Dhoni)

तिसऱ्या टी-20 मध्ये भारताचा पराभव, धोनीच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी करण्याची कोहलीची संधी हुकली
| Updated on: Dec 08, 2020 | 7:16 PM
Share

सिडनी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2020) यांच्यातील  तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 12 रन्सनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला जिंकण्यासाठी 187 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारताला हे लक्ष्य पार करण्यात अपयश आलं. विराट कोहलीने त्याच्या नेतृत्त्वात अनेक विक्रम नावावर केले आहेत. सिडनीमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवत क्रिकेटच्या प्रत्येक स्वरुपात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्याचा विक्रम कोहलीनं नावावर केला. मात्र, तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानं महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी करण्यात अपयश आलं आहे. (Virat Kohli missed to equal MS Dhoni record against Australia)

टी-20 मालिकेत व्हाईट वॉश करण्यात अपयश

वनडे मालिका पराभूत झाल्यानंतर भारतानं पहिले दोन टी-20 सामने जिंकत मालिका खिशात टाकली होती. भारतानं कॅनबेरामध्ये पहिला सामना 11 धावांनी जिंकला तर दुसरा सामना 6 विकेटनी जिंकला. यामुळे भारताकडे ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या सामन्यात पराभव करुन व्हाईट वॉश देण्याची संधी होती. मात्र, भारत तिसऱ्या सामन्यात 12 धावांनी पराभूत झाला. टीम इंडियानं 2016 महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा पराभव केला होता. (Virat Kohli missed to equal MS Dhoni record against Australia)

ऑस्ट्रेलियाला तिन्ही प्रकारात पराभूत करण्याचा विक्रम

विराट कोहलीने टी-20 मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाला सर्व प्रकारात पराभूत करण्याचा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसी नेही असा विक्रम केला आहे.

भारताचा 12 धावांनी पराभव

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच बॉलला सलामीवीर के. एल. राहुल शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने धावफलक हालता ठेवला. अधूनमधून शिखर-विराट आक्रमक फटके खेळत होते. मात्र असाच आक्रमक फटका खेळण्याच्या नादात शिखर धवनला कॅच आऊट व्हावं लागलं. 21 बॉलमध्ये त्याने 28 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यरला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलं.

भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 07 बाद 174 एवढ्या धावा करता आल्या. तिसरी आणि अखेरची मॅच जिंकत ऑस्ट्रेलियाने या मालिकेचा शेवट गोड केला. विराट कोहलीची झुंजार 85 धावांची खेळी व्यर्थ गेली. भारताने 3 टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.  (Virat Kohli missed to equal MS Dhoni record against Australia)

संबंधित बातम्या:

India vs Australia 1st T20 Update : टीम इंडियाची विजयी सलामी,ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय 

India vs Australia 2020 3rd T20 Live Updates : अखेरचा टी-ट्वेन्टी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड, भारताचा 12 रन्सने पराभव

(Virat Kohli missed to equal MS Dhoni record against Australia)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.