Sunil Gavaskar : विराट कोहली की, सचिन तेंडुलकर वनडे क्रिकेटमध्ये ग्रेट कोण? सुनील गावस्कर यांचं स्पष्ट उत्तर
Sunil Gavaskar : विराट कोहलीच्या 52 व्या वनडे सेंच्युरीनंतर वनडे क्रिकेटमध्ये खरा किंग कोण? ही चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. सुनील गावस्कर यांनी रोखठोकपणे मत मांडताना ग्रेट कोण? या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यासाठी गावस्कर यांनी रिकी पाँटिंगचा दाखला दिला.

विराट कोहली की, सचिन तेंडुलकर…क्रिकेटचा खरा किंग कोण? यावर सोशल मीडियापासून सामान्य चर्चांमध्ये खूप वादविवाद होतात. रांचीमध्ये विराट कोहलीच्या 52 व्या वनडे सेंच्युरीने या डिबेटचा पुन्हा जन्म झाला आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ग्रेट कोण? या प्रश्नाच स्पष्ट उत्तर दिलं. “कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्या उंचीवर पोहोचलाय, जिथे फार कमी खेळाडू पोहोचले आहेत. कदाचित त्यापुढे कोणी नाही” असं गावस्कर म्हणाले. विराट कोहलीवर प्रतिक्रिया देताना सुनील गावस्कर म्हणाले की, “जे त्याच्यासोबत आणि त्याच्याविरोधात खेळले आहेत, ते सर्व मानतात की विराट कोहली हा वनडे फॉर्मेटचा सर्वात महान खेळाडू आहे. हे फक्त कौतुक नाही, तर वर्षानुवर्षाच्या अनुभवातून बनलेलं एक सामूहिक मत आहे”
गावस्कर यांनी आपला मुद्दा पटवून देण्यासाठी रिकी पाँटिंगच उदहारण दिलं. पाँटिंग अलीकडेच म्हणालेला की, विराट कोहली हा मी पाहिलेला वनडे क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. गावस्कर पुढे म्हणाले की, “ऑस्ट्रेलियातून कौतुक होण फार दुर्मिळ बाब आहे. कोणी ऑस्ट्रेलियन खेळाडू हे म्हणत असेल तर चांगलं आहे. त्यावर चर्चेचा प्रश्नच उरत नाही” पाँटिंगची ही टिप्पणी साधारण प्रशंसा नाही, तर एक स्पर्धेतून जन्माला आलेला सन्मान आहे.
आडपडदा न ठेवता मत स्पष्टपणे सांगितलं
विराट कोहलीची सचिन तेंडुलकरशी तुलना होणं स्वाभाविक होतं. गावस्करांनी सुद्धा कुठलाही आडपडदा न ठेवता यावर आपलं मत स्पष्टपणे सांगितलं. सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये 51 शतकं झळकावली. हा रेकॉर्ड मोडणं कठीण वाटत होतं. आता कोहली त्यापुढे निघून गेलाय. गावस्कर म्हणाले की, “सचिन 51 शतकांसह सर्वात वर होता. जेव्हा तुम्ही महान सचिन तेंडुलकरच्या पुढे जाता, तेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही कुठे आहात. सध्या तो शिखरावर एकटा आहे”
कोहलीची एकूण शतकं किती?
या सामन्यात विराट कोहली 135 धावांची इनिंग खेळला. त्याचं वनडे करिअरमधील हे 52 व शतकं होतं. सचिनने त्याच्या वनडे करिअरमध्ये 51 शतकं झळकावली आहेत. सचिनच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये एकूण 100 शतकं आहेत. कोहलीच्या नावावर 83 वनडे शतकं आहेत.
