Video : “विराट कोहली घमंडी होता…”, ख्रिस गेल समोर जिगरी मित्र एबी डिव्हिलियर्सनं केला असा खुलासा

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स दोघंही चांगले मित्र आहे. दोघंही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळले आहेत. त्यामुळे त्यांची मैत्री आणखी फुलली. पण विराट कोहलीला पहिल्यांदा भेटल्यानंतर डिव्हिलियर्सच्या मनात वेगळ्याच भावना होत्या.

Video : विराट कोहली घमंडी होता..., ख्रिस गेल समोर जिगरी मित्र एबी डिव्हिलियर्सनं केला असा खुलासा
Video : ख्रिस गेल सोबत बोलता बोलता एबी डिव्हिलियर्सनं विराटबाबत काय सांगितलं, क्रिकेट विश्वात एकच चर्चाImage Credit source: फाईल फोटो
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 6:11 PM

मुंबई : भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स दोघंही चांगले मित्र आहेत. दोघंही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळले आहेत. त्यामुळे या दोघांची मैत्री सर्वश्रूत आहे. आता या मैत्रीबाबत एबी डिव्हिलियर्स अनेक खुलासे केले. कॅरेबियन दिग्गज खेळाडू ख्रिस गेलशी चर्चा करताना त्याने काही बाबी उघड केल्या. एक वेळ अशी होती की, डिव्हिलियर्सला विराट अजिबात आवडत नव्हता.कारण विराट कोहली घमंडी असल्याचा समज होता. मात्र नंतर बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. फ्रेंचाइसीच्या युट्यूब चॅनेलवर ख्रिस गेलशी बोलताना डिव्हिलियर्सनं ही बाब उघड केली.

टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तेव्हा विराट कोहली या संघाचा भाग होता. तेव्हा विराट कोहलीने संघात आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे विराट कोहलीचं वेगळंच रुप पाहिलं होतं. “मी जेव्हा विराट कोहलीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा हेअर स्टाईल आणि त्याचा अंदाज पाहून घमंडी असल्याचं वाटलं.”, असं एबी डिव्हिलियर्सनं सांगितलं.

“विराट कोहलीला जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली तेव्हा त्याच्याबाबत सन्मान वाढला. कोहली आणि माझ्यात एक भिंत होती. पण त्याला भेटल्यानंतर सर्व संभ्रम दूर झाला.” असं एबी डिव्हिलियर्सनं सांगितलं.

विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स तिघंही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात होते. मात्र संघाला एकदाही किताब जिंकून देता आला नाही. कोहलीने 2013 ते 2021 पर्यंत बंगळुरू संघाचं कर्णधारपद भूषवलं. पण एकदाच अंतिम फेरीत धडक मारता आली. 2016 मध्ये विराटच्या नेतृत्वात संघाने अंतिम सामना खेळला होता. मात्र सनराईजर्स हैदराबादनं पराभूत केलं होतं.

आयपीएल 2023 सीझनमध्ये आरसीबी आपला पहिला सामना पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 एप्रिल रोजी होणार आहे. आयपीएस स्पर्धा सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीला लय सापडली आहे. आता या पर्वात विराटची बॅट कशी तळपते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रॉयल चॅलेंजर्सचे खेळाडू

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदु हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेझलवुड, महिपाल लोमरोर, फिन एलेन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेविड विली, रीस टॉपले, हिमांशु शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.