दिग्गज खेळाडूला होता AIDS, एक्स पार्टनरलाही झाला आजार, केस टाकली
वेल्सचा दिग्गज रग्बी खेळाडू (Rugby player) गॅरेथ थॉमसवर (gareth thomas) केस दाखल केली आहे. त्याचा एक्स पार्टनर इयान बाउमने थॉमसवर सनसनाटी आरोप केला आहे.

मुंबई: वेल्सचा दिग्गज रग्बी खेळाडू (Rugby player) गॅरेथ थॉमसवर (gareth thomas) केस दाखल केली आहे. त्याचा एक्स पार्टनर इयान बाउमने थॉमसवर सनसनाटी आरोप केला आहे. गॅरेथ थॉमसमुळे मुळे एडसची लागण झाली, असा बाउमचा आरोप आहे. थॉमस HIV पॉझिटिव्ह होता, त्याने आपल्याला याची कल्पना दिली नाही, असं इयान बाउमच म्हणणं आहे. थॉमस सोबत मी 2013 ते 2016 दरम्यान रिलेशनशिप मध्ये होतो, असा इयान बाउमचा दावा आहे. थॉमसने तो HIV पॉझिटिव्ह आहे, ही बाब आपल्यापासून लपवली, असं इयानचं म्हणणं आहे. बाउमने आपली चाचणी केली, त्यावेळी त्याला सुद्धा एचआयव्हीची लागण झाल्याचं समजलं.
तो समलिंगी असल्याचा खुलासा केला
गॅरेथ थॉमस वेल्ससाठी 100 सामने खेळला आहे. 1997 ते 2005 पर्यंत तो रग्बी खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली. वर्ष 2011 पर्यंत तो लीग मध्ये खेळत होता. 2009 मध्ये थॉमसने तो समलिंगी असल्याचा खुलासा केला.
बीबीसीने डॉक्युमेंट्री सुद्धा बनवली
वर्ष 2019 मध्ये गॅरेथ थॉमसने त्याला एचआयव्ही बाधा झाल्याचं जाहीर केलं. त्याच्या या आजारावर बीबीसीने डॉक्युमेंट्री सुद्धा बनवली. त्याच नाव गॅरेथ थॉमस: एचआयव्ही आणि मी असं आहे. वर्ष 2019 मध्येच ही डॉक्युमेंट्री ऑन एयर झाली.
रियलिटी शो मध्ये सुद्धा सहभागी झाला
गॅरेथ थॉमसने खेळांशिवाय कॉमेंट्री सुद्धा केली आहे. तो रियलिटी शो मध्ये सुद्धा सहभागी झाला होता. वर्ष 2015 मध्ये तो गेट यूअर एक्ट टुगेदर आणि द जम्प या चौथ्या सीरीज मध्येही होता.
