West Indies tour New Zealand | न्यूझीलंडला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार

वेस्टइंडिज न्यूझीलंडविरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:29 AM, 25 Nov 2020
west indies tour new zealand all rounder colin de grandhomme to miss test series due to injury

वेलिंग्टन : वेस्टइंडिजचा संघ सध्या न्यूझीलंड (West Indies tour New Zealand) दौऱ्यावर आहे. वेस्टइंडिज या दौऱ्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand Cricket Team) 3 सामन्यांची टी 20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी 20 मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच कसोटी मालिकेची सुरुवात 3 डिसेंबरपासून होत आहे. या कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा ऑलराऊंडर खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमला (Colin de Grandhomme) दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. West Indies tour New Zealand all rounder colin de grandhomme to miss Test series due to injury

ग्रँडहोमच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे ग्रॅंडहोमला कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. ग्रॅंडहोमच्या जागी कसोटी संघात डॅरेल मिचेलला संधी देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंडचा फिरकीपटू एझाज पटेलच्या प्रकृतीबद्दल ही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एझाज कसोटी मालिकेत खेळणार की नाही, याबाबत अनिश्चिचतता आहे.

कॉलिनबाबत प्रशिक्षकांची प्रतिक्रिया

“कॉलिनला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले, हे फार निराशाजनक आहे. आता तो बे ओव्हल येथे होणा बॉक्सिंग डे कसोटीसाठी दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करेल”, असं न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले.

तसेच एजाज पटेललाही पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळण्याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे त्याच्या जागी कव्हर खेळाडू म्हणून ऑलराऊंडर मिचेल सॅंटनरला (Mitchell Santner) पहिल्या कसोटीसाठी स्थान देण्यात आलं आहे. एजाज दुसऱ्या कसोटीपर्यंत दुखापतीतून सावरेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

सॅंटनर न्यूझीलंडचा आठवा टी 20 कर्णधार

केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत टीम साऊथी पहिल्या 2 टी 20 सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. तर त्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी साऊथीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे मिचेल सॅंटेनरला शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी न्यूझीलंडच्या नेतृत्वाची जबादारी देण्यात आली आहे. सॅंटनर हा टी 20 मध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व करणारा आठवा कर्णधार ठरला आहे. वेस्टइंडिजच्या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. या टी 20 मालिकेत एकूण 3 सामने खेळले जाणार आहेत.

विंडीज विरुद्ध न्यूझीलंड T 20 मालिका

27 नोव्हेंबर 2020, पहिला टी 20 सामना, ऑकलंड

29 नोव्हेंबर 2020, दुसरा टी 20 सामना , माउंट माउनगुई

30 नोव्हेंबर 2020, तिसरा टी 20 सामना , माउंट माउनगुई

विंडीज विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका

3-7 डिसेंबर, पहिला कसोटी सामना, हॅमिल्टन

11-15 डिसेंबर, दुसरी कसोटी मॅच, वेलिंग्टन

संबंधित बातम्या :

International Cricket Matches | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज विरुद्ध न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड ‘या’ एकाच दिवशी आमनेसामने

West Indies tour New Zealand all rounder colin de grandhomme to miss Test series due to injury