LPL 2020 Chris Gayle | गोलंदाजांचा कर्दनकाळ युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलची लंका प्रीमियर लीगमधून माघार

या स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

LPL 2020 Chris Gayle  | गोलंदाजांचा कर्दनकाळ युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलची लंका प्रीमियर लीगमधून माघार
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 6:55 PM

कोलंबो : वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज युनिव्हर्स बॉल ख्रिस गेल (Chris Gayle) लंका प्रीमियर लीगमध्ये (Lanka Premier League) खेळताना दिसणार नाही. गेलने तडकाफडकी एलपीएलमधून माघार घेतली आहे. गेलने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. कॅंडी टस्कर्स टीम मॅनेजमेंटने फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गेलने माघार घेतल्याने त्याजागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याबाबत अजून कोणती माहिती देण्यात आली नाही. गेल कॅंडी टस्कर्स (Kandy Tuskers) टीमसाठी खेळणार होता. universal boss chris gayle withdraws from sri lanka premier league

गेलने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 7 सामन्यात 288 धावा केल्या होत्या. गेलने आयपीएलमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केलं होतं. गेलला आयपीएलचा पहिला टप्पा संपल्यानंतर संघात स्थान देण्यात आलं होतं. गेलने या 7 सामन्यात चांगलीच फटकेबाजी केली होती. त्यामुळे गेल चाहत्यांना आयपीएलनंतर एलपीएलमध्ये गेलची फटकेबाजी पाहायला मिळणार होती. मात्र आता गेलने माघार घेतली आहे.

एलपीएलमधून माघार घेणारा गेल एकमेव खेळाडू नाहीये. पाकिस्तानचा खेळाडू सरफराज अहमदने नुकतीच या स्पर्धेतून माघार घेतली. सरफराज गॉल ग्लोडिएटर्स संघाचं नेतृत्व करणार होता. तसेच लियाम प्लंकेटनेही माघार घेतली आहे.

कॅंडी टस्कर्सकडून अनेक अनुभवी खेळाडू खेळणार आहेत. यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण आणि मुनाफ पटलेचा समावेश आहे. तसेच श्रीलंकेच्या कुशल मेडिंस, नुवान प्रदीप आणि इंग्लंडच्या लियाम प्लंकेटचा समावेश आहे.

स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात

एलपीएल स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत जाफना स्टॅलियन्स, दाम्बुला हॉक्स, कॅंडी टस्कर्स, कोलंबो किंग्स आणि गॉल ग्लेडिएटर्स असे एकूण 5 संघ खेळणार आहेत. कोलंबो, कॅंडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना 5 जिल्ह्यांच्या नावावरुन 5 संघांचे नाव ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना कॅंडी टस्कर्स विरुद्ध कोलंबो किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. यामध्ये एकूण 23 साखळी सामने खेळले जाणार आहेत. साखळीनंतर 13 आणि 14 डिसेंबरला 2 सेमीफायनल सामने खेळण्यात येणार आहे. या सेमीफायनलमध्ये जिंकणारे संघ 16 डिसेंबरला अंतिम सामन्यात आमनेसामने भिडतील.

हे सर्व सामने श्रीलंकेतील एकूण 4 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहेत. आर प्रेमदासा आंतराराष्ट्रीय स्टेडियम कोलंबो, रनगिरी दांबूला आंतराराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेल आंतराराष्ट्रीय स्टेडियम आणि सूर्यावेवा महिंदा राजपक्षे क्रिकेट स्टेडियम या 4 मैदानात हे सामने खेळण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

टीम इंडियाचा ‘हा’ माजी अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरण्यास सज्ज, ‘या’ टी 20 लीगमध्ये खेळणार

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

universal boss chris gayle withdraws from sri lanka premier league

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.