Chris Gayle | षटकारांचा बादशाह ख्रिस गेलचा नवा विक्रम, T20 मध्ये एक हजार षटकार ठोकणारा पहिला फलंदाज

विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने टी20 क्रिकेटमध्ये 1000 हजार षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. गेलने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला. (Chris Gayle complete one thousand sixes t20 cricket)

Chris Gayle | षटकारांचा बादशाह ख्रिस गेलचा नवा विक्रम, T20 मध्ये एक हजार षटकार ठोकणारा पहिला फलंदाज

अबुधाबी : विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने टी20 क्रिकेटमध्ये 1000 हजार षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. गेलने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला. टी 20 क्रिकेटमध्ये 1 हजार षटकार ठोकणारा ख्रिस गेल हा जगातील पहिला फलंदाज झाला आहे. आजच्या सामन्यात राजस्थानविरुद्ध 99 धावांची खेळी करताना ख्रिस गेलने 8 षटकार आणि 6 चौकार लगावले. (Chris Gayle complete one thousand sixes t20 cricket)

आयपीएलमध्ये ख्रिस गेलने आतापर्यंत 349 षटकार ठोकले आहेत. गेलच्या नावावर आता सर्वाधिक 1001 षटकारांची नोंद आहे. कार्तिक त्यागीच्या गोलंदाचीवर गेलने विक्रमी षटकार खेचला. गेलला हा विक्रम करण्यासाठी 7 षटकारांची गरज होती.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीमध्ये ख्रिस गेल, केरॉन पोलार्ड, ब्रँडन मॅक्युलम, शेन वॉटसन आणि आंद्रे रसेल यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे.
1. ख्रिस गेल : 410 मॅच 1001 षटकार
2. केरॉन पोलार्ड : 524 मॅच 690 षटकार
3. ब्रँडन मॅक्युलम : 370 मॅच 485 षटकार
4. शेन वॉटसन : 343 मॅच 467 षटकार
5.आंद्रे रसेल: 339 मॅच 447 षटकार

आयपीएलचा 13 वा हंगाम सुरु होण्यापूर्वी ख्रिस गेलला 1000 षटकारांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 22 षटकारांची गरज होती. सुरूवातीच्या 7 सामन्यांमध्ये ख्रिस गेलचा संघात समावेश करण्यात आला. टी-20 मध्ये सर्वाधिक 1041 चौकार लगावण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे.

दरम्यान, आयपीएल (IPL 2020) मधील 50 वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) आणि राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यामध्ये शेख झायेद स्टेडियमवर होत  आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबनं राजस्थान रॉयल्ससमोर 186 धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार के.एल.राहुल आणि ख्रिस गेल या दोघांनी पजांबचा डाव सावरला. ख्रिस गेलने 99 तर के.एल. राहुलनं 46 धावा केल्या.

संबंधित बातम्या :

Chris Gayle | चौकार-षटकारांचा पाऊस, तब्बल दहा हजार रन्स जागेवर उभा राहून, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम

Chris Gayle | युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल रुग्णालयात, बेडवरुन चाहत्यांना खास संदेश

(Chris Gayle complete one thousand sixes t20 cricket)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI