IPL 2020 : 800 सामने आणि 12 वर्षांच्या इतिहासात न घडलेली गोष्ट यंदा घडली

अक्षय चोरगे

|

Updated on: Oct 29, 2020 | 2:29 PM

आयपीएलमध्ये (IPL) दरवर्षी लोकांना आश्चर्य वाटेल अशा अनेक गोष्टी घडत असतात. आयपीएलचा यंदाचा यूएईमध्ये सुरु असलेला सीजनदेखील त्याला अपवाद नाही.

IPL 2020 : 800 सामने आणि 12 वर्षांच्या इतिहासात न घडलेली गोष्ट यंदा घडली
Follow us

दुबई : आयपीएलमध्ये (IPL) दरवर्षी लोकांना आश्चर्य वाटेल अशा अनेक गोष्टी घडत असतात. इंडियन प्रिमियर लीगचा (Indian Premier League) यंदाचा यूएईमध्ये (UAE) सुरु असलेला सीजनदेखील त्याहून वेगळा नाही. कधी धांवाचे डोंगर, तर कधी दोन-दोन सुपर ओव्हर, कधी एकाच खेळाडूची लागोपाठ दोन शतकं, तर कधी तीन वेळा विजेता ठरलेल्या संघाचं स्पर्धेबाहेर पडणं अशा अनेक घटनांनी यंदाच्या आयपीएलचं वेगळेपण सिद्ध केलं. परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये अशी एक गोष्ट घडली आहे, जी यापूर्वी 12 वर्ष आणि 800 सामन्यांमध्ये कधीच घडली नाही. (First time in IPL history not a single team qualify for playoffs after 48 matches)

आयपीएल 2020 (IPL) मध्ये आतापर्यंत 48 सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मुंबईने आतापर्यंत 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यांचा नेट रनरेटही सर्व संघापेक्षा जबरदस्त आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) 12 सामन्यांमध्ये 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आहे. त्यांनीदेखील 12 सामन्यांमध्ये 14 गुण मिळवले आहेत.

इतके सामने होऊनदेखील अद्याप कोणताही संघ प्ले ऑफसाठी दावेदारी सिद्ध करु शकलेला नाही. 48 सामने होऊनदेखील कोणताही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही, असं आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कधीही झालेलं नाही. आयपीएलमधील 49 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळवला जाणार आहे. 50 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्समध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यांनंतरही कोणताही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाही.

मुंबई इंडियन्सची जागा जवळपास पक्की

आयपीएलमध्ये 50 सामने होत आल्यानंतर सर्वत्र चर्चा असते की, प्ले ऑफमध्ये जाणारा तिसरा किंवा चौथा संघ कोणता असेल. परंतु यंदा प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ कोणता हेच अद्याप ठरलेलं नाही. मुंबईच्या संघाने प्ले ऑफसाठी दावेदारी जवळपास सिद्ध केली आहे, परंतु अजून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, तसेच आपणही तसा दावा करु शकत नाही. कारण काही चमत्कारीक समीकरणं तयार झाली तर मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो.

यंदाच्या आयपीएलची गुणतालिका आणि 48 सामन्यांचे निकाल पाहिले एक गोष्ट स्पष्ट होते की, यंदाची आयपीएल स्पर्धा खूपच जबरदस्त ठरली आहे. सर्वच संघ एकापेक्षा एक आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई वगळता इतर सर्व संघांचं स्पर्धेतील आव्हान अजून जिवंत आहे. त्यामुळे हे सातही संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी पुढील सामन्यांमध्ये अजून जोर लावतील यात शंका नाही.

संबंधित बातम्या

IPL 2020: हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जीवंत, दिल्लीला स्पर्धेबाहेर पडण्याची भीती?

विराटही विचारतो ‘जेवलीस का?’, मैदानातून अनुष्काला खाणाखुणा

IPL 2020: सूर्यकुमारच्या शानदार खेळीनंतर रवी शास्त्रींचं ट्विट, संतप्त चाहत्यांचा शास्त्रींवर हल्लाबोल

(First time in IPL history not a single team qualify for playoffs after 48 matches)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI