IPL 2020: हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जीवंत, दिल्लीला स्पर्धेबाहेर पडण्याची भीती?

आयपीएलमध्ये मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सनराजयर्स हैदराबादने विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

IPL 2020: हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जीवंत, दिल्लीला स्पर्धेबाहेर पडण्याची भीती?
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 3:12 PM

दुबई : इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सनराजयर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. तर दिल्लीचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला आहे. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांसमोर दिल्लीचा डाव 19 षटकात आटोपला. दिल्लीचा संघ 131 धावांवर गारद झाला.

कर्णधार बर्थडे बॉय डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा हे दोघे हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले. हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करताना या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी केली. या दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांची खूप धुलाई केली. 88 धावांनी हा सामना जिंकत हैदराबादच्या संघाने गुणतालिकेत नेट रनरेट वाढवला आहे. तर दुसऱ्या बाजूला गुणतालिकेत गेल्या काही दिवसांपासून पहिल्या-दुसऱ्या स्थानावर असलेला दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यासोबत दिल्लीच्या संघाचा नेट रनरेटदेखील कमी झाला आहे.

प्लेऑफ सामन्यांमध्ये क्वालिफाय होण्यासाठी दिल्लीच्या संघाला पुढील दोनपैकी एक सामना जिंकणे आवश्यक आहे. परंतु दिल्लीच्या संघासाठी ते सोपं नाही. दिल्लीचे पुढील दोन सामने गुणतालिके पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध आहेत. दिल्लीचा संघ पुढील दोन्ही सामने पराभूत झाला तर त्यांचा नेट रनरेट अजून कमी होईल, त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचणे दिल्लीला अवघड जाईल.

दुसऱ्या बाजूला मुंबई आणि बँगलोरचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. त्यांना या तीनपैकी एक सामना जिंकणे आवश्यक आहे. आज मुंबई आणि बँगलोरमध्ये सामना होणार आहे. आज या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरेल. जो संघ पराभूत होईल. त्या संघाकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी अजून दोन सामने शिल्लक असतील.

दरम्यान, लागोपाठ पाच सामने जिंकून पंजाबचा संघदेखील 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थानच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजून संपुष्टात आलेल्या नाहीत. त्यामुळे कालपर्यंत गुणतालिकेत टॉपला असलेल्या दिल्लीच्या संघासमोरची आव्हानं वाढली आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2020: वर्ल्ड क्लास बॉलरची साहा-वॉर्नरकडून धुलाई, रबाडाचा रथ रोखला; तीन वर्षांपासूनच्या रेकॉर्डला ब्रेक

India Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू द्या, सुनील गावसकर कडाडले

Australia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले

IPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

(IPL 2020 : Delhi Capitals playoff looks difficult after defeat by Sunrisers hyderabad)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.