AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar fiancé : सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या व्याहींचा बिझनेस काय? सानियाचं साराशी काय कनेक्शन?

Sachin Tendulkar son's engagement : सचिन मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरुडा झाला. सानिया चंडोकशी त्याचं लग्न ठरल्याचं वृत्त आहे. ती नामांकित बिझनेस कुटुंबातील असून तिचा स्वत:चाही बिझनेस आहे. सानिया चंडोक नेमकी कोण, ती काय करते, अर्जुनची बहीण सारा हिच्याशी तिचं कसं नातं आहे, जाणून घ्या सगळं काही फक्त एका क्लिकवर..

Arjun Tendulkar fiancé :  सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या व्याहींचा बिझनेस काय? सानियाचं साराशी काय कनेक्शन?
अर्जुन तेंडुलकर - सानियाImage Credit source: social media
| Updated on: Aug 14, 2025 | 1:08 PM
Share

Who is Saaniya Chandok, Arjun Tendulkar fiance : ‘क्रिकेटचा देव’ अशी ख्याती असलेला सचिन तेंडुलकर लवकरच सासरेबुवा बनणार आहे. कारण त्याचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. सानिया चंडोक याच्याशी त्याची एंगजेमेंट झाली असून अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक ही मुंबईतील एका मोठ्या आणि श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील आहे. विशेष म्हणजे सानियाचे अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरशीही एक खास बाँडिंग आहे.

27 वर्षीय सारा तेंडुलकर, ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, तिचे सानिया चांडोकशी खूप जवळचे नाते आहे. तिने अनेक वेळा इन्स्टाग्रामवर सानियासोबतचे फोटो आणि रील्स शेअर केले आहेत. सानिया आणि साराने मार्च महिन्यात जयपूरमध्ये झालेल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेच फोटो आता पुन्हा व्हायरल होत आहेत.

सानियाचं कुटुंब कोण, काय करतात ?

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची भावी वधू सानिया चांडोक ही रवी घई यांची नात आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात झाला. दोन्ही कुटुंबांचे जवळचे सदस्य आणि मित्र या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र तेंडुलकर किंवा चंडोक कुटुंबियांपैकी कोणीही याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. घई कुटुंब हे मुंबईतील एक मोठे आणि प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब आहे. ते इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरी असलेला आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत.

सानिया चंडोक काय करते ?

रिपोर्टनुसार, सानिया चांडोक ही मुंबईतील Mr. Paws Pet Spa & Store LLPमध्ये भागीदार आणि डायरेक्टर आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेले रवी इक्बाल घई हे Graviss Hospitality Ltd चे अध्यक्ष आहेत. हा एक कौटुंबिक व्यवसाय आहे ज्याची मुळे हॉटेल आणि आईस्क्रीम उद्योगात खोलवर रुजलेली आहेत. रवी घई हे इक्बाल कृष्णा ‘आय.के.’ घई यांचे पुत्र आहेत, ज्यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील प्रसिद्ध क्वालिटी आईस्क्रीम ब्रँड आणि इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलची स्थापना केली.

रवी घई यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे नेला आणि भारत तसेच मध्य पूर्वेत व्यवसायाचा विस्तार केला. त्यांनी तेथे आईस्क्रीम उत्पादन युनिट्स उघडली आणि निर्यात वाढवली. त्यांच्या नेतृत्वाखाली, ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटीने त्यांच्या व्यवसायात विविधता आणली. ही कंपनी अजूनही इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल चालवते आणि नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करते. यापैकी एक म्हणजे ब्रुकलिन क्रीमरी, जी त्यांचा नातू शिवन घई यांनी सुरू केली. हा ब्रँड त्याच्या हेल्थ-फोकस्ड आईस्क्रीमसाठी प्रसिद्ध आहे.

अर्जुन तेंडुलकर कोण ?

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्स संघात 30 लाख रुपयांना स्थान देण्यात आले. 25 वर्षीय अर्जुनने 2021 साली मुंबई संघासाठी टी20 पदार्पण केले. त्याच वेळी, त्याने 2022 मध्ये गोव्यासाठी प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए पदार्पण केले. 2023 च्या हंगामात त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने आयपीएलच्या 5 सामन्यांमध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत आणि 13 धावा केल्या आहेत. 2024 च्या आयपीएलच्या हंगामात अर्जुनलाही संघात समाविष्ट करण्यात आले होते, जिथे त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती.

अर्जुन तेंडुलकरची आकडेवारी

17 फर्स्ट क्लास मॅच, 37 विकेट, 532 रन

18 ल‍िस्ट ए मॅच, 25 विकेट, 102 रन

24 टी20 मॅच, 27 विकेट, 119 रन

टॅलेंटेड सानिया आणि मेहनती अर्जुन

सानियाची व्यावसायिक हुशारी आणि अर्जुनची क्रिकेटची आवड यामुळे हे जोडपे एक पॉवर कपल बनले आहे. बऱ्याच काळापासून कठोर परिश्रम करणाऱ्या अर्जुनला त्याचे वडील, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी मिळवलेल्या यशाइतके यशअद्याप क्रिकेटमध्ये मिळालेले नाही. अर्जुन स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याकडून आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तो डावखुरा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे ज्याला मोठे फटके कसे मारायचे हे देखील माहित आहे.

दोन शक्तिशाली कुटुंबांचे मिलन

सोशल मीडियावर अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याची बातमी येताच चाहत्यांना खूप आनंद झाला. हे फक्त अर्जुन आणि सानियाचे मिलन नव्हते तर मुंबईतील दोन प्रभावशाली कुटुंबांचे मिलन आहे. हा साखरपुडा समारंभ जितका खाजगी होता तितकाच तो ग्लॅमरसही होता. हा साखरपुडा समारंभ एक खाजगी कार्यक्रम होता ज्यामध्ये फक्त दोन्ही बाजूंचे जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.