PK vs CSK IPL 2021 Match Prediction | के एल राहुल विरुद्ध महेंद्रसिंह धोनी आमनेसामने, पंजाब बाजी मारणार की चेन्नई पहिला विजय साकारणार?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) आजचा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

PK vs CSK IPL 2021 Match Prediction | के एल राहुल विरुद्ध महेंद्रसिंह धोनी आमनेसामने, पंजाब बाजी मारणार की चेन्नई पहिला विजय साकारणार?
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) आजचा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 8 वा सामना आज (16 एप्रिल) पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्य खेळवला जाणार आहे. या सामन्यात विकेटकीपर कर्णधार आमनेसामने असणार आहेत. (who wil win chennai super kings vs punjab kings ipl match prediction previous match stats in marathi)

उभयसंघातील आकडेवारी काय सांगते?

आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नई पंजाबवर वरचढ राहिली आहे. चेन्नईने 14 मॅचमध्ये पंजाबचा पराभव केला आहे. तर पंजाबनेही 9 सामन्यांमध्ये चेन्नईवर मात केली आहे.

विकेटकीपर कर्णधार आमनेसामने

या सामन्यात विकेटकीपर कर्णधार आमनेसामने असणार आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि पंजाबचा कॅप्टन यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही खेळाडू कॅपट्न्सी, फलंदाजी आणि विकेटकीपिंग अशी तिहेरी जबाबदारी सांभाळतात. या मोसमातील पहिल्या सामन्यात केएल राहुलने राजस्थान विरुद्ध 50 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 91 धावांची खेळी केली होती. केएल गेल्या मोसमातील ऑरेन्ज कॅप होल्डर राहिला होता. त्याने ती कामिगिरी या मोसमातही सुरु ठेवली आहे.

तर दुसऱ्या बाजूला धोनी या हंगामातील पहिल्या सामन्यात भोपळा फोडण्यातही अपयशी ठरला होता. धोनी दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. तसेच चेन्नईला पहिल्या सामन्यात नवख्या दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे धोनीला या सामन्यात वैयक्तिक कामगिरीसह कर्णधाराची जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून धोनीची चेन्नई विजयाचं खातं उघडणार की पंजाब सलग दुसरा विजय मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर) , इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्‍लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्‍पा, के गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरि निशांत.

पंजाब किंग्सची टीम

केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, शाहरुख खान, झाये रिचर्डसन, मुरुगन अश्विन, रिले मेरीडीथ, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, मोईसेस हेनरिक्स, मनदीप सिंग, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मालन, जलज सक्सेना, सरफराज खान, फॅबियन एलन, सौरभ कुमार, ईशान पोरेल, रवी बिश्नोई, उत्कर्ष सिंग, दर्शन नलकंडे, प्रभासीमरण सिंग आणि हरप्रीत ब्रार.

संबंधित बातम्या :

IPL 2021 CSK vs PBKS Head to Head Records | पंजाब विरुद्ध चेन्नई आमनेसामने, कोण जिंकणार सामना? पाहा आकडेवारी

IPL 2021 CSK vs PKBS : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?

(who wil win chennai super kings vs punjab kings ipl match prediction previous match stats in marathi)

Published On - 4:49 pm, Fri, 16 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI