AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅटिंगमध्ये शतक नाही, बॉलिंगमध्ये विकेट नाही; तरी मुंबई इंडियन्सने ल्यूक विलियम्सकडे सोपवली मोठी जबाबदारी, कारण काय?

Mumbai Indians Head Coach News: मुंबई इंडियन्सने नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. ल्यूक विलियम्सकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बॅटिंगमध्ये शतक नाही, बॉलिंगमध्ये विकेट नाही; तरी मुंबई इंडियन्सने ल्यूक विलियम्सकडे सोपवली मोठी जबाबदारी, कारण काय?
| Updated on: Sep 24, 2026 | 4:08 PM
Share

महिला प्रीमियर लीग २०२७ च्या आधी मुंबई इंडियन्सने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स संघाने नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन्सने लिसा केटलीशी संबंध तोडले आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियन ल्यूक विल्यम्स यांची संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचे कारण मुंबई इंडियन्सने सांगितले आहे.

मुंबई इंडियन्सने सांगितले की, सप्टेंबर २०२५ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या केटली यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज केटली यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने पाच संघांच्या स्पर्धेत चौथे स्थान पटकावले. स्पर्धेच्या चार हंगामांमधील ही संघाची सर्वात खराब कामगिरी होती. मुंबई इंडियन्सने २०२३ आणि २०२५ मध्ये डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावले, तर २०२४ मध्ये संघ एलिमिनेटरपर्यंत पोहोचला होता.

संघाच्या मालक नीता अंबानी म्हणाल्या की, ल्यूक एक यशस्वी प्रशिक्षक असून त्यांच्याकडे प्रचंड अनुभव, महिला क्रिकेटची सखोल जाण आणि खेळाडूंच्या विकासासाठी असलेली दृढ वचनबद्धता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावर ल्यूक विल्यम्स यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आपल्याला रोमांचक क्रिकेट खेळण्याची आणि यशासाठी स्पर्धा करण्याची एक उत्तम संधी आहे. ज्याद्वारे आपण एकत्र मिळून काहीतरी खास निर्माण करू शकू.

याआधी २०२५ च्या डब्ल्यूपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने पहिले विजेतेपद पटकावले. तेव्हा विल्यम्स संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी ‘द हंड्रेड’मधील सदर्न ब्रेव्ह महिला संघाचे आणि महिला बिग बॅश लीगमधील अॅडलेड स्ट्रायकर्स महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. ल्यूक विल्यम्स एक महान प्रशिक्षक असले तरी एक खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द निराशाजनक होती.

एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी पाच सामने खेळले. त्या पाच सामन्यांमध्ये त्यांनी ११.४० च्या सरासरीने केवळ ११४ धावा केल्या. त्यांनी शतक किंवा अर्धशतकही झळकावले नाही. इतकेच नव्हे तर, त्यांनी एकही बळी घेतला नाही. २८ जानेवारी २००५ रोजी त्यांची कारकीर्द संपली आणि त्यानंतर त्यांनी प्रशिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश केला. आज ते महिला क्रिकेटमधील सर्वात आदरणीय प्रशिक्षकांपैकी एक आहेत.

मुंबई इंडियन्सने ल्यूक विल्यम्स यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ल्यूक विल्यम्स यांना ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतात प्रशिक्षणाचा अनुभव आहे. ते २० वर्षांहून अधिक काळ प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंचा विकास आणि डेटा-आधारित रणनीतींवर लक्ष केंद्रित करतात. त्यांनी यापूर्वी मुंबई इंडियन्ससोबत काम केले असून, त्यात शार्लट एडवर्ड्स यांच्यासोबत काम करण्याचाही समावेश आहे.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश