LIVE सामन्यातच ‘भारतीय’ महिलेकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक भारतातील मुस्लीम महिला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानी वंशाचे कॅनडीयन लेखक तारिक फतह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

LIVE सामन्यातच ‘भारतीय’ महिलेकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
Follow us
| Updated on: Jul 04, 2019 | 8:10 PM

मुंबई: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक भारतातील मुस्लीम महिला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानी वंशाचे कॅनडीयन लेखक तारिक फतह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच ती महिला अहमदाबादमधील रहिवासी असल्याचा दावा केला आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये सुरु असलेल्या सामन्यातील खेळाडूंच्या ड्रेसवरुन हा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा असल्याचे दिसते. दरम्यान, सामना सुरु असतानाच एक महिला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत आहे. तारिक फतह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “भारतातील अहमदाबादची एक महिला पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसोबत आणि ‘क्रिकेट चाचा’सोबत “पाकिस्तान जिंदाबाद”च्या घोषणा देत आहेत. तसेच ते पाकिस्तान भारताविरोधात देखील जिंकेल असे म्हणत आपली निष्ठा व्यक्त करत आहेत.”

तारिक फतह यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एक महिला प्रसिद्ध क्रिकेट फॅन ‘क्रिकेट चाचा’ उर्फ चौधरी अब्दुल जलील यांच्यासोबत फोटो काढताना दिसत आहे. त्यानंतर ही महिला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देते. यावेळी ती पाकिस्तान भारताविरुद्धच्या सामन्यात जिंकेल, असेही म्हणते. ही महिला व्हिडीओत स्वतःला गुजरातमधील अहमदाबादची असल्याचे सांगत आहे. तसेच क्रिकेट चाचा देखील आपण अहमदाबादला भेट दिल्याचे सांगत आहे. संबंधित महिला आपल्या मुलीसारखी असल्याचेही ते सांगतात.

‘अहमदाबाद पोलीस संबंधित महिलेच्या मागावर’

फतह यांच्या या ट्विटवर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथकही या महिलेचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध मोहिम राबवली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने संबंधित महिला अहमदाबादची असून ती ब्रिटनमध्ये राहत असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.