WPL 2023 : अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध दिल्ली सामना, कोणता संघ वरचढ? जाणून घ्या

वुमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली विरुद्ध मुंबई असा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम फेरीचा सामना अतितटीचा होणार अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे.

WPL 2023 : अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध दिल्ली सामना, कोणता संघ वरचढ? जाणून घ्या
WPL 2023 : अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध दिल्ली सामना, कोणता संघ वरचढ? जाणून घ्याImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 11:01 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या वहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दोनदा दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एका सामन्यात मुंबईने, तर एका सामन्यात दिल्लीने बाजी मारली. साखळी फेरीत धावांच्या सरासरीने दिल्लीने अंतिम फेरीत धडक मारली. तर मुंबईने एलिमिनेटर फेरीत युपीला पराभवाची धूळ चारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 26 मार्चला अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे.

अंतिम फेरीत मुंबई आणि दिल्ली तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. पण मुंबईच्या गोलंदाजासमोर 18 षटकात सर्वबाद 105 धावा करता आल्या. मुंबईने हे आव्हान 15 व्या षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. मुंबईने दिल्लीवर 8 गडी आणि 30 चेंडू राखून विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात दिल्लीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात मुंबईला 109 धावांवर रोखलं. इतकंच काय तर जबरदस्त फलंदाजी करत दिल्लीने हे आव्हान 9 षटकात पूर्ण केलं. त्यामुळे धावगतीत चांगलाच फरक पडला. मुंबई आणि दिल्लीचे समगुण असूनही दिल्लीची वर्णी थेट अंतिम फेरीत लागली.

दिल्लीची जमेची बाजू म्हणजे मेग लॅनिंग चांगल्याच फॉर्मात आहे. तिने 8 सामन्यात 51.66 च्या सरासरीने 310 धावा केल्या आहेत.तर मुंबईच्या गोलंदाजीला चांगलीच धार आहे. एमिला केर, सायका इशाक, हिली मॅथ्युज यांनी चांगली गोलंदाजी टाकली आहे.तर इसी वाँगनं युपीविरुद्ध पहिली वहिली हॅटट्रीक घेत विक्रमाची नोंद केली आहे.

मुंबईची गोलंदाजी भेदून काढण्यात दिल्लीला यश आलं तर जेतेपद पटकावणं सोपं होईल. पण मुंबई दिल्लीला सहजासहजी असं करू देणार नाही. त्यामुळे स्पर्धेत दोन्ही संघ तुल्यबल आहेत. असंच म्हणावं लागेल.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्‍त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्‍यूज, क्‍लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्‍ट आणि जिंतामनी कलिटा.

दिल्ली कॅपिट्ल्स टीम | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.