सुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू अडचणीत, FIR दाखल होण्याची चिन्हं

संबंधित महिला राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू आहे. सुशीलला मदत केल्याच्या आरोपाखाली नोटिस बजावून पोलिस तिलाही चौकशीसाठी बोलावू शकतात (Sushil Kumar female friend interrogated )

सुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू अडचणीत, FIR दाखल होण्याची चिन्हं
सुशील कुमार
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 1:31 PM

नवी दिल्ली : पैलवान सागर राणा हत्या प्रकरणात अडकलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार (Sushil Kumar) याच्या निकटवर्तीय महिला खेळाडूचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने सुशील कुमारविरोधात मोबाईल फूटेज आणि साक्षीदारांच्या जबाबानुसार तपास सुरु केला आहे. (Wrestler Sushil Kumar female friend may interrogated in Sagar Rana Murder Case)

सुशीलची मैत्रीण अडचणीत

स्पेशल सेलने जेव्हा सुशील आणि अजय यांना अटक केली, तेव्हा ते स्कूटीने मुंडका परिसरात फिरत होते. ही स्कूटी सुशीलकुमारच्या मैत्रिणीची आहे. संबंधित महिला राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू आहे. सुशीलला मदत केल्याच्या आरोपाखाली नोटिस बजावून पोलिस तिलाही चौकशीसाठी बोलावू शकतात. पुरावे आढळल्यास तिच्याविरोधात एफआयआरही दाखल केला जाऊ शकतो.

पोलिसांकडे पुरावे काय?

दुसरीकडे, सुशील कुमार तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलीस अधिकारी सांगत आहेत. कुस्तीपटू सागर धनखर हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या फरार सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली. सुशीलने वापरलेले सिम कार्ड तोडून नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे अटकेतील आरोपी प्रिन्स दलालने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ आणि अमित उर्फ सोनू यांची जबानी, हेच पुरावे आहेत.

इतर आरोपींविरोधात पुराव्यांमध्ये घटनास्थळी सापडलेली वाहनं, मोबाईल आणि परवाना असलेली बंदूक यांचा समावेश आहे. सुशीलच्या सांगण्यावरुन मोबाईल आणि दांडक्यासारखे पुरावे नष्ट करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचे कलमही लावण्यात आले आहे.

मोक्का अंतर्गत कारवाईची तयारी

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार सुशील कुमारवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरु आहे. मोक्का अंतर्गत संघटित स्वरुपाच्या गुन्हेगारीवर कारवाई होते, मोक्का लावल्यास जामीन मिळताना अडचणी येऊ शकतात. या अंतर्गत आजन्म कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. गँगस्टर काला जठेडी आणि नीरज बवाना यांच्यासोबत सुशीलचे कनेक्शनही समोर येत आहे.

कोण आहे सुशील कुमार?

सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अॅथलीट आहे. 37 वर्षीय सुशील कुमारने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं. त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डर दिवशीचा Video व्हायरल

हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकं काढली जाणार?

(Wrestler Sushil Kumar female friend may interrogated in Sagar Rana Murder Case)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.