सागर राणा हत्या प्रकरणात बेड्या, मग रेल्वेने नोकरीतून हाकललं, आता सुशील कुमारला आणखी एक झटका

कुस्तीपटू सुशील कुमारचा शस्त्रास्त्र परवाना निलंबित करण्यात आला आहे (Arms License Sushil Kumar )

सागर राणा हत्या प्रकरणात बेड्या, मग रेल्वेने नोकरीतून हाकललं, आता सुशील कुमारला आणखी एक झटका
कुस्तीपटू सुशील कुमार
अनिश बेंद्रे

|

Jun 01, 2021 | 10:16 AM

नवी दिल्ली : 23 वर्षीय पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला (Sushil Kumar) आणखी एक झटका बसला आहे. सुशीलचा शस्त्रास्त्र परवाना निलंबित करण्यात आला आहे. लायसन्स विभागाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. याआधी उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केल्यामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली होती. (Arms License of wrestler Sushil Kumar has been suspended after arrest in Sagar Rana Murder Case)

ऑलिम्पिक पुरस्कार विजेता सुशील कुमार हा उत्तर रेल्वेचा वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक होता. 2015 पासून तो प्रतिनियुक्तीवर दिल्ली सरकारमध्ये कार्यरत होता. त्याला शालेय स्तरावरील खेळाच्या विकासासाठी छत्रसाल स्टेडियमवर विशेष अधिकारी (OSD) म्हणून नियुक्त केले होते.

पोलिसांनी खाक्या दाखवताच सुशील कुमारला रडू कोसळलं

कुस्तीच्या मैदानात आडदांड पैलवानांना लोळवत दोनदा ऑलिम्पिक पदक आणि कॉमनवेल्थमध्ये तीनदा सुवर्णपदक मिळवणारा हरियाणाचा कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसी खाक्या दिसल्यावर अक्षरशः रडल्याचं पाहायला मिळालं. कुस्तीपटू सागर धनखर हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या फरार सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि इथूनच पोलिसांनी आपला खाक्या दाखवत तपासाची चक्रं वेगानं फिरवायला सुरुवात झाली. (Arms License Sushil Kumar)

दिल्ली पोलिसांनी सुशील कुमार आणि त्याचा मित्र सहआरोपी अजय बक्करवाला यांना तीन ठिकाणी नेऊन चौकशी करण्यात आली. यात मॉडल टाऊन, शालीमार बाग आणि छत्रसाल स्टेडियम या ठिकाणांचा समावेश आहे.

सुशील कुमारकडून छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या घटनेची कबुली

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमारने छत्रसाल स्टेडियमवर झालेली घटना मान्य केलीय. मात्र, आपण केवळ दोन गटात झालेल्या वादात त्यांना वाचवत होतो, असा दावा सुशील कुमारने केला. याशिवाय सागर धनखर आणि सोनूला फ्लॅटवर आणण्याबाबत कबुली दिली नाही. गुन्हा करताना सुशील कुमारने वापरलेली गाडी आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळावर पोहचलं.

कोण आहे सुशील कुमार?

सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अॅथलीट आहे. 37 वर्षीय सुशील कुमारने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं. त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डर दिवशीचा Video व्हायरल

हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकं काढली जाणार?

(Arms License of wrestler Sushil Kumar has been suspended after arrest in Sagar Rana Murder Case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें