Vinod Kambli : तू सारखा पोरींसोबत… विनोद कांबळीला कुणी दिली होती वॉर्निंग? काय घडलं होतं?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळीबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. त्याची कारकीर्द इतक्या लवकर का संपली याचे एक मोठे कारण समोर आले आहे.

टीम इंडियामध्ये एकत्र खेळणाऱ्या दोन मित्रांची कहाणी ही कोणापासूनच लपलेली नाही. एक खेळाडू क्रिकेटचा देव बनला पण दुसरा खेळाडू त्याच्या चुकीच्या कृतींमुळे आज अंधारात हरवला आहे. रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटच्या युक्त्या शिकलेले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी जेव्हा त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा कांबळी येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध झाला. लवकरच त्याची लोकप्रियता सचिन तेंडुलकरपेक्षाही जास्त झाली आणि हे कांबळीसाठी अती ठरलं. तो त्याची लोकप्रियता पचवू शकला नाही आणि तो ड्रग्ज घेऊ लागला तसेच मुलींकडे जाऊ लागला. योगराज सिंग यांनी हे गुपित उघड केलं आहे. त्यांनी कांबळीला सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला होता, पण विनोदने ते सीरियसली घेतलंच नाही.
पदार्पणातच टेस्ट क्रिकेटमध्ये झालं नाव
भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्याने 664 सामन्यांमध्ये 34357 धावा केल्या. सचिनला क्रिकेटचा देव म्हणूनही ओळखलं जातं. तर त्याचा मित्र विनोद कांबळी चांगली सुरुवात करूनही नंतर अंधारात हरवला. याच काळात कांबळीने 17 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतके आणि 3 अर्धशतकांसह 1084 धावा केल्या. कांबळी हा 104 एकदिवसीय सामने खेळला असून त्यामध्ये 2 शतकांसह 2477 धावा केल्या. कांबळीची एकदिवसीय कारकीर्द 1991 मध्ये सुरू झाली पण अवघ्या 9 वर्षांतच,2000 साली ती संपली देखील.
कांबळीवर अनेक आरोप
1996 च्या विश्वचषकादरम्यान विनोद कांबळीवर रात्री उशिरापर्यंत दारू पिण्याचा आरोप झाला होता. अशा अनेक आरोपांमुळे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम होऊ लागला. जेव्हा कांबळीचे करिअर धोक्यात असल्याचे दिसत होते, तेव्हा मी कांबळीला मुली आणि ड्रग्जपासून दूर राहून त्याच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता, असं माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
तेव्हा विनोद कांबळीने त्यांना हैराण करणारं उत्तर दिलं, सर तुमची वेळ आता गेली आहे, असं त्याने सिंग यांना सुनावलं होतं. योगराज सिंग यांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी कांबळी स्वतःला राजा मानत होता. पण हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. आणि पाहतात पाहता त्याचीच कारकीर्द संपली. काही महिन्यांपूर्वी विनोद कांबळी गंभीर आजारी पडला होता, त्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी त्याला बरीच मदत केली होती.
