Google | पत्नीचा फोन ट्रॅक करणे, पतीची हेरगिरी करणे, जाहिरातींवर गुगलकडून बंदी

आता गुगलवर पतीची हेरगिरी करणे किंवा पत्नीचा फोन ट्रॅक करण्याच्या जाहिराती दिसणार नाहीत.

Google | पत्नीचा फोन ट्रॅक करणे, पतीची हेरगिरी करणे, जाहिरातींवर गुगलकडून बंदी

मुंबई : गुगलने त्यांची जाहिरात पॉलिसी अपडेट केली आहे (Google Ban Advertisement). त्यामुळे आता गुगलवर पतीची हेरगिरी करणे किंवा पत्नीचा फोन ट्रॅक करण्याच्या जाहिराती दिसणार नाहीत. एखाद्याच्या संमतीशिवाय फोन ट्रॅकिंग किंवा देखरेखीसारख्या ऑफर देणार्‍या उत्पादनांचं किंवा सेवा देणाऱ्या जाहिरातींचं समर्थन गुगल करणार नाही, असं गुगलने जाहीर केलं आहे (Google Ban Advertisement).

गुगलचा हा नवीन नियम स्पायवेअर आणि आपल्या जोडीदारावर पाळत ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावर देखील लागू होईल, असंही गुगलने सांगितलं. टेक्स्ट मेसेज, कॉल्स आणि ब्राऊझिंग हिस्ट्री मॉनिटर करणारे टुल्सही या कॅटेगरीमध्ये येतील.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

GPS ट्रॅकर मार्केटिंग लोकांची परवानगी न घेता त्यांची हेरगिरी करण्याचे दावे करतात. अशा जाहिराती आता गुगलवर दिसणार नाहीत. अशा उपकरणांमध्ये ऑडियो रिकॉर्डर्स, कॅमरा, डॅश कॅम आणि स्पाय कॅमरा असतात. त्याशिवाय, कुठल्याही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हेरगिरी करण्याची जाहिरात आता गुगलवर केली जाणार नाही.

11 ऑगस्टपासून पॉलिसी लागू होणार

मात्र, त्या खासगी गुंतवणूक सेवा आणि उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी घातली जाणार नाही, ज्यांचा वापर पालक त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी करतात, असंही गुगलने स्पष्ट केलं आहे. नवीन पॉलिसीनुसार, अशी उत्पादनं आणि सेवांना यातून वगळण्यात आलं आहे. गुगलची ही ‘अनेबलिंग डिसऑनेस्ट पॉलिसी’ 11 ऑगस्टपासून लागू होणार आहे. या पॉलिसीमध्ये 2018 मधील एका संशोधनानुसार अपडेट करण्यात आले आहेत.

Google Ban Advertisement

संबंधित बातम्या :

सावधान! टिक टॉक बंदीनंतर आता टिक टॉक प्रो, तुमचा डेटा चोरी होण्याची शक्यता

Fake App | Tik Tok च्या फेक लिंक व्हायरल, सरकारकडून महत्त्वाचे आवाहन

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *