पुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार

Samsung, Huawei आणि Vivo ने यावर्षी आपल्या 5G स्मार्टफोनची घोषणा केली. पण या स्मार्टफोनची किंमत जास्त आहे. याच दरम्यान आता नोकियाही आपला 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

पुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार
Follow us
| Updated on: Aug 22, 2019 | 10:18 PM

मुंबई : Samsung, Huawei आणि Vivo ने यावर्षी आपल्या 5G स्मार्टफोनची घोषणा केली. पण या स्मार्टफोनची किंमत जास्त आहे. याच दरम्यान आता नोकियाही आपला 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. नोकियाही आता 5G स्मार्टफोन लाँच करणार असल्याने सॅमसंग, हुवेई, विवो आणि नोकियामध्ये स्पर्धा होणार आहे.

विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत इतर 5G स्मार्टफोनच्या तुलनेने खिशाला परवडणारी असेल, अशी माहिती HMD ग्लोबलचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर जुहो सरविकास यांनी एका मुलाखतीमध्ये दिली.

युजर्स वाढवण्यासाठी कंपनी 5G स्मार्टफोन लाँच करत आहे. दुसऱ्या कंपनीच्या तुलनेने आपल्या फोनची किंमत कमी असावी, याकडे कंपनी लक्ष देत आहे. नोकिया सध्या या फोनसाठी चिपसेट तयार करणाऱ्या क्वॉलकमसोबत काम करत आहे. हा फोन 2020 पर्यंत लाँच केला जाईल, असं जुहो सरविकास यांनी सांगितले.

चिनमध्ये विवोचा 5GVivo iQoo Pro लाँच करण्यात आला आहे. या फोनची चीनमध्ये किंमत 3,198 युआन (भारतीय रुपयात 32 हजार 300 रुपये) आहे. या फोनमध्ये मोठी स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर आणि पॉवरफुल बॅटरी दिली आहे.

5G म्हणजे काय?

सेल्युलर फोनच्या तंत्रज्ञानाच्या विकासातील पाचव टप्पा म्हणजे 5G तंत्रज्ञान, यामुळे मोबाईलवरील डाऊनलोडिंग आणि अपलोडिंगचा स्पीड वाढणार असून नेटवर्क कनेक्ट होण्याचा स्पीडही वाढणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.