PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

पबजी हा मोबाईल गेम भारतात परतणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आता भारतात बॅन असलेलं टिकटॉक हे व्हिडीओबेस अॅपदेखील परतण्याची शक्यता आहे.

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 10:27 PM

नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, केंद्र सरकारने बंदी आणलेला पबजी (Pubg) हा मोबाईल गेम भारतात परतणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आता भारतात बॅन असलेलं टिकटॉक (TikTol) हे व्हिडीओबेस अॅपदेखील परतण्याची शक्यता आहे. दरम्यान टिकटॉकची मालकी असलेली कंपनी बाईटडान्सची सरकारसोबत बातचित सुरु आहे. कंपनीला टिकटॉक अॅप पुन्हा भारतात लाँच करायचं आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. (TikTok hopes to return In india soon as Pubg makes comeback)

टिकटॉक बॅन केल्यानंतर बाईटडान्स कंपनीने त्यांच्या भारतातील एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरुन हटवलेले नाही. कंपनीचे भारतात 2000 हून अधिक कर्मचारी आहेत. सर्व लोकांच्या नोकऱ्या कायम असून कर्मचाऱ्यांना यंदा बोनसही दिला आहे. टिकटॉकचे हेड निखिल गांधी यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, आपली कंपनी लवकरच भारतात परतणार आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत, तसेच सरकारशी बोलत आहोत.

गांधी यांनी पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले होते की, समाजावर आपल्या व्यासपीठाचा सकारात्मक प्रभाव राहावा यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचे कर्मचारी हे आमच्या व्यवसायाचा पाया आहेत. आम्ही त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर काळजी घेत आहोत. तसेच आम्ही स्थानिक कायद्यांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. यामध्ये डेटा सुरक्षा आणि गोपनियतेच्या नियमांचा समावेश आहे.

PUBG Mobile Game भारतात परतणार

दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशन भारतीय बाजारात लवकरच नवा गेम लाँच करणार आहे. हा गेम केवळ भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी PUBG Corporation चिनी कंपनी Tenncent सोबत कोणतीही भागिदारी करणार नाही. भारतात हा गेम PUBG Mobile India या नावाने लाँच केला जाणार आहे.

PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरुक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार करणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

PUBG Mobile India हा गेम कधी लाँच होणार, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनीकडून एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे, त्यात म्हटलं आहे की, आम्ही गेमच्या लाँचिंगबाबत लवकरच माहिती जाहीर करु.

संबंधित बातम्या

TikTok App: टिकटॉकच्या अजब गोष्टी, एक फेल अ‍ॅप यूट्यूबचा प्रेक्षक खेचणारं एकमेव अ‍ॅप कसं झालं?

अमेरिकेत सत्ताबदल होताच TikTok ची डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात कोर्टात याचिका

TikTok | …म्हणून टिकटॉकने हटवले 3.7 कोटी भारतीयांचे व्हिडीओ!

(TikTok hopes to return In india soon as Pubg makes comeback)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.