Xiaomi -Mito चा ट्रिपल फ्लिप कॅमेरा स्मार्टफोन लवकरच लाँच होणार

Asus नंतर आता Xaomi फ्लिप कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, हा फोन शाओमी नाही तर मेतू या ब्राण्डनेम खाली लाँच केला जाणार आहे.

Xiaomi -Mito चा ट्रिपल फ्लिप कॅमेरा स्मार्टफोन लवकरच लाँच होणार

मुंबई : Asus नंतर आता Xiaomi फ्लिप कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, हा फोन शाओमी नाही तर मेतू या ब्राण्डनेम खाली लाँच केला जाणार आहे. मेतूने गेल्यावर्षी शाओमीसोबत भागीदारी केली होती. या दोघांच्या भागीदारीनंतरचा हा पहिला फ्लिप स्मार्टफोन असणार आहे.

चीनची मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट वेईबोवर या नव्या स्मार्टफोनचं पोस्टर शेअर केलं आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची डिझाईन ही Asus Zenphone 6 आणि 6Z च्या फ्लिप कॅमेऱ्यासारखीचं आहे. Asus च्या तुलनेत मेतू फोनचा कॅमेरा सेटअप हा मोठा दिसत आहे. कारण, यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरासोबतच एलईडी फ्लॅशही देण्यात आला आहे. कॅमेऱ्याचं हे सेटअप चौकोणी आकारात आहे. जर हे सेटअप फोनच्या मागच्याबाजूने असेल तर मेतूचा हा नवा फोन हुवावे मेट 20 प्रोच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसारखं दिसेल.

वेईबोच्या पोस्टमध्ये दाखवण्यात आलेल्या फोनबाबत अधिक माहिती तर देण्यात आलेली नाही. मात्र, या फोटोवरुन हा नवा फोन गोल्ड-पिंक ग्रेडिअंट डिझाईनमध्ये असण्याची शक्यता आहे. यासोबतच फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपही असणार आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असणार आहे.

या फोनला शाओमी-मेतूच्या नव्या ‘लिटिल फेअरी’ हे नाव देण्यात आलं आहे. नावावरुन हा फोन जगभरातील महिलांना लक्षात ठेऊन तयार करण्यात आला असावं असा अंदाज आहे. या फोनमध्ये जबरदस्त फिचर्ससोबतच याच्या डिझाईनवरही लक्ष दिल्याचं दिसत आहे. यामध्ये AI बेस्ड ब्यूटी एन्हान्समेंट फिचर्सही दिले जातील. पॉप अप कॅमेरानंतर आता बाजारात फ्लिप कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा ट्रेंड असणार आहे.

संबंधित बातम्या :

हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सहज सापडणार, केवळ ‘हा’ नंबर डायल करा!

Xiaomi च्या स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर

फेसबुक, स्नॅपचॅटमधील ‘हे’ लोकप्रिय फिचर अद्याप व्हॉट्सअपमध्ये नाही

भारताला 5G ची स्वप्न, पण 4G स्पीडमध्येही बफरिंग, वेग मंदावलेलाच

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *