AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio ला टक्कर देण्यासाठी Airtelचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, किंमत फक्त…

एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी एक सर्वात स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांला अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस सेवा मिळत आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण या प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात...

Jio ला टक्कर देण्यासाठी Airtelचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, किंमत फक्त...
jio and airtel
| Edited By: | Updated on: Jul 10, 2025 | 4:26 PM
Share

भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन लॉंच करत असतात. अशातच आता एअरटेल प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एअरटेलन कडून एक नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच करण्यात आला आहे, या प्लॅनची ​​किंमत खुप स्वस्त आहे. हा प्लॅन रिलायन्स जिओच्या 189 रुपयांच्या प्लॅनला कडक टक्कर देऊ शकतो, चला जाणून घेऊया एअरटेलचा हा नवीन प्लॅनची किंमत आणि हा प्लॅन जिओ आणि व्होडाफोन आयडियाच्या स्वस्त प्रीपेड प्लॅनशी स्पर्धा करू शकेल की नाही?

रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी एअरटेलने एक नवीन स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या नवीन रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 189 रुपये आहे, हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत साइट आणि अॅपवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा परवडणारा प्लॅन शोधणाऱ्या वापरकर्त्यांना नक्की आवडेल, 189 रुपयांचा प्लॅन खरेदी केल्यावर तुम्हाला कोणते फायदे आणि किती दिवसांची वैधता मिळेल? चला जाणून घेऊया.

एअरटेल 189 प्लॅनची ​​माहिती

एअरटेलच्या 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 21 दिवसांची वैधता दिली जाणार आहे. तर या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये प्रीपेड वापरकर्त्यांना 1 जीबी हाय स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळतील. हा प्लॅन अशा लोकांसाठी लाँच करण्यात आलेला आहे ज्यांना अधिक डेटाऐवजी कमी किमतीत अमर्यादित कॉलिंगचा फायदा हवा आहे.

जिओ 189 प्लॅनची ​​माहिती

जर आपण रिलायन्स जिओच्या 189 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोललो तर हा प्लॅन तुम्हाला एअरटेलपेक्षा दुप्पट डेटा देईल. हो, हा प्लॅन 1 नाही तर 2 जीबी हाय स्पीड डेटा देतो. याशिवाय, एअरटेलच्या तुलनेत, जिओचा हा प्लॅन तुम्हाला 1 आठवडा जास्त वैधता देईल, म्हणजेच जिओ प्लॅनसह तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल.

व्होडाफोन आयडियाचा 199 प्लॅन

व्होडाफोन आयडियाकडेही एक स्वस्त प्लॅन आहे पण त्याची किंमत जिओ आणि एअरटेलपेक्षा 10 रुपये जास्त आहे. VI चा 199 रुपयांचा प्लॅन 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस देखील मिळते. हा प्लॅन एअरटेलपेक्षा जास्त आणि जिओच्या बरोबरीचा व्हॅलिडिटी देतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही 199 रुपये खर्च केले तर तुम्हाला कंपनीकडून 28 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाईल.

रिलायन्स जिओ आणि एअरटेल प्लॅनची ​​किंमत सारखीच असूनही, एअरटेल प्लॅन कमी फायदे आणि वैधता देत आहे, म्हणून जर तुमच्याकडे दोन्ही कंपन्यांचे सिम कार्ड असतील तर हुशारीने रिचार्ज करा.

Follow Us
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...