Airtel ने आणला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा खास प्लॅन, Netflix, JioHotstar मिळणार फ्री
एअरटेलने ३ नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये नेटफ्लिक्स, झी५ आणि जिओहॉटस्टार फ्री मिळत आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांपर्यंत दिली जात आहे.

एअरटेलच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. कंपनीने अलीकडेच ३ नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. य़ा खास प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि ५ जी डेटासह नेटफ्लिक्स, झी५ आणि जिओहॉटस्टार अशा ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. एअरटेलचे हे प्लॅन २७९ रुपयांपासून सुरू होतात, या प्लॅनची वैधता ८४ दिवसांपर्यंत दिली जात आहे. या प्लॅन्सबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात.
एअरटेलचा ८४ दिवसांचा प्लॅन
एअरटेलचा ८४ दिवस वैधता असलेला रिचार्ज प्लॅन १७२९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये भारतात अनलिमिटेड मोफत कॉलिंगची सुविधा मिळते. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये, ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा आणि १०० मोफत एसएमएसचा लाभही मिळतो. तसेच या रिचार्ज प्लॅनसह अमर्यादित ५ जी डेटा देखील मिळतो, यासाठी तुमच्याकडे ५ जी स्मार्टफोन असने गरजेचे आहे.
या खास प्लॅनमध्ये प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना नेटफ्लिक्स बेसिक, झी५ प्रीमियम, जिओहॉटस्टार सुप्रीम आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम या ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस देण्यात येत आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असल्याने ओटीटी अॅप्सचाही ८४ दिवसांसाठी अॅक्सेस देण्यात येतो.
इतर प्लॅनमध्येही मोफत ओटीटी सब्सक्रिप्शन
एअरटेलने ५९८ रुपयांचा आणखी एक २८ दिवसांच्या वैधतेचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्येही ग्राहकांना नेटफ्लिक्स बेसिक, झी५ प्रीमियम, जिओहॉटस्टार सुपर, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियमचा अॅक्सेस मिळणार आहे. या प्लॅनमध्येही अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड ५जी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएस या सुविधाही मिळतात. त्याचबरोबर २७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्येही ग्राहकांना वरील सर्व ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.
