Amazon Sale : अवघ्या 23 हजारात आयफोन, सेलमध्ये आयपॅड आणि मॅकबुकचाही समावेश

अक्षय चोरगे

|

Updated on: Dec 11, 2020 | 6:57 PM

आघाडीची ई-कॉमर्स कंपनी Amazon ने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा मोठ्या सेलचं आयोजन केलं आहे. अमेझॉनचा हा सेल अॅपल लव्हर्ससाठी खास असणार आहे.

Amazon Sale : अवघ्या 23 हजारात आयफोन, सेलमध्ये आयपॅड आणि मॅकबुकचाही समावेश

Follow us on

मुंबई : ई-कॉमर्स कंपनी Amazon ने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा मोठ्या सेलचं आयोजन केलं आहे. यावेळी कपंनी नेहमीप्रमाणे अनेक स्मार्टफोन्सवर मोठमोठ्या ऑफर्स देणार आहेच, सोबतच यावेळी अ‍ॅपलच्या (Apple) स्मार्टफोन्सवरही धमाकेदार ऑफर दिल्या जाणार आहेत. (Amazon Apple Days sale goes live, offers on Phone 12 series, iPhone 11 and more)

अमेझॉनचा सेल अॅपल लव्हर्ससाठी खास असणार आहे. अमेझॉनचा अॅपल डेज हा सेल सध्या साईटवर लाईव्ह आहे, जो 16 डिसेंबपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये कंपनी आयफोन आणि आयपॅडवर बंपर डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर देत आहे. अमेझॉनने आयफोन सीरिज 12, आयफोन 11, आयफोन 7, आयपॅड मिनी आणि मॅकबुकवरही चांगल्या ऑफर्स सादर केल्या आहेत.

अमेझॉन कंपनी आयफोन 11 केवळ 51 हजार 999 रुपये इतक्या किंमतीत विकत आहे. या फोनवर तुम्हाला 2 हजार 990 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही आयफोन 7 हा केवळ 23 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनवर अमेझॉनने 1 हजार 750 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. परंतु त्यासाठी तुमच्याकडे येस बँकेचं क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे. युजर्स अमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन सर्व प्रकारचे मॉडेल, त्यांच्या किंमती आणि त्यावरील ऑफर्सची माहिती घेऊ शकतात.

अमेझॉनने आयपॅड मिनीवर 5000 रुपयांची सूट दिली आहे. जर तुमच्याकडे HDFC बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला अतिरिक्त 3000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. अॅपलच्या मॅकबुकवरही कंपनीने मोठी ऑफर दिली आहे. मॅकबुकवर कंपनीने 6000 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. परंतु त्यासाठी तुमच्याकडे HDFC बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असणं आवश्यक आहे.

आयफोन 12 वर अमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी कोणतीही ऑफर दिलेली नाही. मात्र एचडीएफसी बँकेकडून यावर चांगली ऑफर दिली जात आहे. HDFC बँकेच्या कार्डवर तब्बल 6000 हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. तसेच यावर चांगले ईएमआय पर्यायही देण्यात आले आहेत. हीच ऑफर आयफोन 12 प्रोसाठीदेखील आहे.

संबंधित बातम्या

जुना अँड्रॉइड फोन द्या अन् नवा आयफोन घ्या, ‘iPhone 12’वर तब्बल 22 हजारांचा घसघशीत ‘डिस्काउंट’!

Flipkart Sale : रियलमी, आयफोन आणि मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट

128 जीबी स्टोरेज आणि 6000mAh ची बॅटरी, किंमत अवघी 11,999, Moto चा दमदार फोन लाँच

(Amazon Apple Days sale goes live, offers on Phone 12 series, iPhone 11 and more)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI