TRAI AI : नकोशा कॉल्सपासून आता लवकरच तुमची सूटका, TRAI करणार नसबंदी! शोधली नामी युक्ती

TRAI AI : मोबाईलवर येणाऱ्या नकोशा कॉल्समुळे आणि एसएमएसमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तर आता अवघे दोन तीन दिवस कळ काढा, कारण यावर लवकरच लगाम लावण्यात येणार आहे.

TRAI AI : नकोशा कॉल्सपासून आता लवकरच तुमची सूटका, TRAI करणार नसबंदी! शोधली नामी युक्ती
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 5:44 PM

नवी दिल्ली : आपण अनेकदा कामात असतो वा प्रवास असताना नकोशा कॉल्सचा (Unwanted Calls) त्रास होतो. एखाद्या दिवशी तर कहर होतो. दिवसातून दहा कॉल्स तरी नको असताना उचलावे लागतात. पण आता देशातील कोट्यवधी ग्राहकांना जास्त काळ या नकोशा कॉल्सपासून वैतागावे लागणार नाही. नकोशा कॉल्सपासून लवकरच त्यांची सूटका होणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) त्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन यावर तोडगा काढण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास देणाऱ्या कंपन्याची आपोआप नसबंदी करण्यात येईल.

काय आहे प्लॅन TRAI, ग्राहकांना या नकोशा कॉल्सपासून वाचविणार आहे. तसेच खोट्या एसएमएसपासून मुक्ती देणार आहे. त्यासाठी आभासी तंत्रज्ञानाचा, म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI Filter) वापर करण्यात येईल. या यंत्रणेमुळे नेहमी सतावणाऱ्या कॉल्सची, एसएमएसची ओळख पटेल आणि तुमच्या फोनपर्यंत हे कॉल्स येणारच नाहीत. नेटवर्कवरच हे कॉल्स फिल्टर होतील. त्यासाठी 1 मेपासून मोठे बदल करण्यात येत आहे.

मोबाईल कंपन्यांवर जबाबदारी दूरसंचार विभागाने यासाठी मोबाईल कंपन्यांना एआय आधारित स्पॅम फिल्टर बसविण्याचे निर्देश दिले आहेत. या फिल्टरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे 1 मे नंतर ग्राहकांना दिलासा मिळेल. नेटवर्क पातळीवरच नको असलेले कॉल्स ब्लॉक होतील. सर्वसामान्यांच्या मोबाईलवर असे कॉल्स येणार नाहीत. तर स्पॅम एसएमएसविषयी पण असेच धोरण राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खास यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. फसवणूक करणाऱ्या लिंक्सचा वापर करणारे एसएमएस पण नेटवर्क पातळीवरच ब्लॉक होतील. ते ग्राहकांपर्यंत पोहचणारच नाहीत.

हे सुद्धा वाचा

टेलिमार्केटिंग कंपन्याना फटका या नवीन नियमांमुळे ग्राहकांची आपोआप सूटका तर होईलच. पण टेलिमार्केटिंग कंपन्यांना जोरदार फटका बसेल. तसेच त्यांना आता नियम पाळवे लागतील. सर्वसामान्य क्रमांकावरुन या कंपन्या ग्राहकांना नाहक त्रास देत होत्या. 200-300 सिम कार्ड खरेदी करुन ग्राहकांना विविध कंपन्यांच्या ऑफरच्या नावाखाली गंडविण्यात येत होते. बँक क्रेडिट कार्ड, कर्ज, विविध आकर्षक योजनांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यात येत होती. ती टळणार आहे. टेलिमार्केटिंग कंपन्यांना आता नियमात राहून त्यांच्या प्रोमोशनसाठी एक खास मोबाईल क्रमांक घ्यावा लागणार आहे.

ग्राहकांना दिलासा TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल रिचार्चसाठी 30 दिवसांची वैधता करण्याचे निर्देश दिले होते. तसेच तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले होते. त्यामुळे देशातील कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची लूट थांबली आहे.

Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.