Apple चा Holiday Sale सुरू, ॲपल वॉच, आयपॅड आणि एअरपॉड्सवरही हे खास ऑफर्स जाणून घ्या
ॲपलने भारतात हॉलिडे फेस्टिव्ह ऑफर्स सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये मॅकबुक वर कॅशबॅक आणि आयफोन 17 प्रो वर 5 हजार रूपयांची सूट देण्यात येत आहे. ॲपल वॉच, आयपॅड आणि एअरपॉड्सवरही ऑफर्स आहेत. सर्व ऑफर्स ॲपल इंडिया वेबसाइटवर लाईव्ह आहेत. चला तर मग ॲपलच्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

ॲपलने भारतात हॉलिडे फेस्टिव्ह ऑफर्स लाँच केल्या आहेत. या ऑफर्समध्ये आयफोन, मॅकबुक, आयपॅड, ॲपल वॉच आणि एअरपॉड्सचा समावेश आहे. या ऑफर्स ॲपलच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह आहेत आणि चेकआउट केल्यावर ऑटोमॅटिक कॅशबॅक उपलब्ध असेल. मात्र कंपनी थेट सवलत देत नाही, परंतु आयसीआयसीआय, ॲक्सिस आणि अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर त्वरित कॅशबॅक देत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण ॲपलच्या या सेल बद्दल आणि खास ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.
MacBook Air M4 आणि MacBook Pro वर 10,000 रुपयांची सूट
Apple च्या वेबसाइटवर MacBook Air M4 ची किंमत 99,900 रूपये आहे, परंतु ICICI, Axis आणि American Express कार्ड वापरून खरेदी केल्यास तुम्हाला 10 हजार रूपयांचा त्वरित कॅशबॅक मिळतो. यामुळे 13-इंच MacBook Air ची ऑफर्स नंतर किंमत 89,900 रूपये होते. हीच ऑफर M4 चिप असलेल्या MacBook Pro मॉडेल्सना लागू होते, ज्यामुळे 14-इंच MacBook Pro ची किंमत 159,900 रूपये आहे आणि 16-इंच MacBook Pro M4 ची किंमत 239,900 पर्यंत कमी होते. हा कॅशबॅक कोणत्याही कूपन कोडशिवाय चेकआउटवर थेट दिसून येतो.
iPhone 17 Series वरही इन्स्टंट कॅशबॅक ऑफर
Apple iPhone 17 सिरीजवर ॲपलच्या या सेलदरम्यान 5,000 पर्यंत कॅशबॅक मिळत आहे. iPhone 17 ची उपलब्धता मर्यादित आहे, Apple च्या वेबसाइटवर मर्यादित युनिट्स दिसत आहेत आणि पात्र कार्ड नसलेल्या ग्राहकांना फक्त 1,000 रूपयांची सूट मिळत आहे. 1,34,900 किमतीच्या iPhone 17 Pro वर पूर्ण 5,000 रूपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच iPhone 16 आणि 16 Plus मॉडेल Apple.in वरून खरेदी केल्यास 4000 रूपयांच्या सूट देण्यात येत आहेत, तर इतर किरकोळ विक्रेते त्याहूनही जास्त सूट देतात.
Apple Watch, AirPods आणि iPad वरही Festive Offers
Apple Watch Series 11 वर 4,000 रूपयांची बँक सूट दिली जात आहे. ग्राहकांना Watch SE 3 मॉडेलवर 2,000 रूपयांची कॅशबॅक आणि AirPods Pro 3 आणि AirPods 4 वर 1,000 रूपयांची सूट देखील मिळू शकते. iPad Air जे 11-इंच आणि 13-इंच आहेत त्यावर देखील 4 हजार रूपयांची सूट लागू आहे, तर स्टँडर्ड iPad आणि iPad Mini वर 3,000 पर्यंतची सुट देतात. यामुळे मोठ्या स्क्रीन मॉडेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या सेलदरम्यान अतिरिक्त फायदे मिळत आहेत.
सबस्क्रिप्शन फायदे: Apple Music आणि Apple TV+ मोफत
या ऑफर्ससोबतच ॲपल सबस्क्रिप्शन बेनिफिट्स देखील देत आहे. ॲपल वॉच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तीन महिने ॲपल म्युझिक मोफत मिळते. ॲपल इंडिया ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केलेल्या कोणत्याही प्रोडक्टमध्ये तीन महिन्यांचे ॲपल टीव्ही+ सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट असते, ज्यामुळे एकूण खरेदी आणखी आकर्षक होते.
