AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोनप्रेमींसाठी वाईट बातमी, Apple iPhone 13 मधलं ‘महत्त्वाचं’ फीचर भारतात चालणार नाही

भारतातील आयफोनप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. आयफोन 13 मधील सॅटेलाईट फीचर (उपग्रह वैशिष्ट्य) भारतात चालणार नाही, असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

आयफोनप्रेमींसाठी वाईट बातमी, Apple iPhone 13 मधलं 'महत्त्वाचं' फीचर भारतात चालणार नाही
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 8:41 AM
Share

मुंबई : Apple कंपनीने आपल्या आयफोन लाइनअपमधील आयफोन 12 मध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी ऑफर केली. याला लोकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. अशा स्थितीत या वर्षीच्या आयफोनमध्ये कंपनी 5G तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे टाकणार आहे. आयफोन 13 मध्ये नवीन सेल्युलर रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विश्लेषक मिंग ची कू के यांच्या मते, आयफोन 13 लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच LEO सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचरसह येऊ शकतो, जे फोन नेटवर्क नसतानाही आपल्याला कॉल करण्यास आणि एसएमएस पाठविण्यात मदत करेल. (Apple iPhone 13 Satellite calling, SMS feature will not run in India)

कु म्हणाले की, LEO तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आयफोनमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे सेल्युलर कनेक्टिव्हिटी अपग्रेड असणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमचे डिव्हाइस सॅटेलाइट आधारित कम्युनिकेशन क्रिएट करेल. तुमचे डिव्हाइस 4G किंवा 5G नेटवर्क रेंजच्या बाहेर असतानाही हे शक्य होईल. 2019 मध्ये ब्लूमबर्गने पहिल्यांदा अहवाल दिला होता की, Apple लवकरच आयफोनमध्ये LEO उपग्रह सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड वापरणार आहे.

दरम्यान, भारतातील आयफोनप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. आयफोन 13 मधील सॅटेलाईट फीचर (उपग्रह वैशिष्ट्य) भारतात चालणार नाही. ब्लूमबर्गचा पाठपुरावा सूचित करतो की, हे फीचर लिमिटेड असेल. आगामी आयफोन 13 मधील हे सॅटेलाईट फीचर वापरकर्त्यांना नेटवर्क कव्हरेज नसलेल्या भागात आपत्कालीन संपर्कांशी कनेक्ट करण्याची परवानगी देते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार यामध्ये पृथ्वीच्या जवळच्या ऑर्पिबटमधील सॅटेलाईट्सच्या रेडिओ कनेक्शनचा समावेश असेल.

या सर्व्हिसद्वारे पाठवल्या जाणाऱ्या मेसेजेसमध्ये कॅरेक्टर्स लिमिट नॉर्मलपेक्षा कमी असेल आणि आपण iMessage वर पाहिल्याप्रमाणे निळ्या किंवा हिरव्याऐवजी राखाडी बबलसह दर्शविली जाईल. सॅटेलाईट फीचरद्वारे इमरजन्सी मेसेज फीचर वापरून पाठवलेले मेसेज प्राप्तकर्त्याच्या उपकरणावर डू नॉट डिस्टर्ब डाउनटाइम सेटिंग्ज बायपास करण्यास सक्षम असतील कारण ते इमरजन्सी मेसेज आहे.

iPhone 13 घ्यायचाय? खिसा हलका करण्याची तयारी ठेवा

आयफोनच्या किंमतीवरुन मिमर्स आधीच किडनी विकण्याचे मिम्स बनवत असतात. गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 12 प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 19 हजार रुपये इतकी आहे. आता आयफोन 13 लाँच होण्याच्या मार्गावर आहे. हा फोन आयफोन 12 पेक्षाही महाग असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर किडनीवरुन तयार केलेले मिम्स पाहायला मिळू लागले आहेत.

Apple कंपनी पुढील महिन्यात आयफोन 13 लाँच करण्याची योजना आखत आहे. चिप उत्पादन खर्चातील वाढ भरून काढण्यासाठी टेक जायंट Apple आगामी आयफोनची किंमत वाढवेल. डिजिटाइम्सच्या मते, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग रिंग कंपनी (टीएसएमसी) त्यांच्या चिप उत्पादनाची किंमत वाढवण्याची योजना आखत आहे, ज्याचा परिणाम Apple सह अनेक कंपन्यांच्या ग्राहकांवर होईल.

टीएसएमसी त्यांच्या लेटेस्ट आणि मेच्योर प्रक्रिया तंत्रज्ञानासाठी त्याची किंमत 20 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. या वाढीचा परिणाम TSMC च्या ग्राहकांवर होईल, ज्यात Apple iPhone उत्पादक आहेत, ज्यांनी त्यांची iPhone 13 सिरीज अधिक किंमतीवर विकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून कंपनीच्या नफ्यावरील परिणाम कमी होईल. अहवालानुसार, या बदलांमुळे, आयफोन 13 च्या किंमतीत 3-5 टक्के वाढ होईल कारण लेटेस्ट सब -7 एनएम प्रोसेस टेक्नॉलॉजी कोट्स 3-10 टक्के वाढू शकतात.

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री?

Apple ने आयफोन 13 सिरिजच्या लाँचिंगची तारीख निश्चित केली आहे, असे म्हटले जात आहे. परंतु वापरकर्त्यांना अद्याप याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण आता एका चीनी सोशल मीडिया वेबसाईट नुसार, Apple 17 सप्टेंबरला आपला पुढील आयफोन लाइनअप लाँच करू शकते. साधारणपणे Apple कंपनी मंगळवारी लॉन्च इव्हेंट आयोजित करते आणि शुक्रवारपासून त्या उत्पादनाची विक्री सुरू होते.

तसेच, पोस्टमधून हे देखील उघड झाले आहे की, कंपनी गुरुवारी, 30 सप्टेंबर रोजी थर्ड जनरेशन एअरपॉड लॉन्च करणार आहे. Weibo पोस्टवर तारीख जाहीर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये ई-कॉमर्स अॅपचे चित्र दिसत आहे, ज्यात आगामी Apple उत्पादनांची माहिती देण्यात आली आहे. अ‍ॅपच्या स्क्रीनशॉटनुसार, अॅपल 17 सप्टेंबरपासून आयफोन 13 चे चारही मॉडेल विकण्यास सुरुवात करेल. यामध्ये आयफोन 13, आयफोन 13 प्रो, आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 प्रो मॅक्सचा समावेश असेल. आयफोन लाँच केल्यानंतर, एअरपॉड्स 3 सप्टेंबरमध्ये सादर केले जातील.

इतर बातम्या

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा

30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…

(Apple iPhone 13 Satellite calling, SMS feature will not run in India)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.