AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी… या मॉडेल्सवर युट्यूब ॲप सपोर्ट होणार कायमचा बंद

आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना युट्यूबने मोठा धक्का दिला आहे, खरंतर युट्यूबने एक नवीन अपडेट आणले आहे ज्यानंतर निवडक आयफोन वापरकर्त्यांसाठी ॲप सपोर्ट बंद करण्यात आला आहे. कोणत्या मॉडेल्ससाठी सपोर्ट बंद करण्यात आला आहे आणि तुमच्या फोनवर युट्यूब ॲप चालेल की नाही? चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया.

iPhone वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी... या मॉडेल्सवर युट्यूब ॲप सपोर्ट होणार कायमचा बंद
युट्यूब नाही दिसणारImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 07, 2025 | 1:49 PM
Share

तुम्ही अजूनही जुना आयफोन आणि आयपॅड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. कारण युट्यूबने अलीकडेच त्यांच्या ॲपचे नवीन व्हर्जन (20.22.1) रोलआऊट म्हणजेच जारी केला आहे. या नवीन व्हर्जनमुळे जुने आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी युट्युब अॅपचा सपोर्ट बंद करण्यात आला आहे. म्हणजेच युट्युबचा नवीन व्हर्जन iOS 16 आणि त्यावरील असलेल्या मॉडेल्सला सपोर्ट करेल, याचा अर्थ असा की जर तुमचा आयफोन किंवा आयपॅड iOS 15 वर काम करत असेल, तर आता तुम्ही तुमच्या फोनवर युट्युब अॅप चालवू शकणार नाही.

या मॉडेल्समध्ये सपोर्ट उपलब्ध राहणार नाही:

या बदलाचा सर्वात जास्त परिणाम अशा यूझर्सवर होईल जे अजूनही iOS 15 वर काम करत असलेले आयफोन आणि आयपॅड वापरत आहेत. YouTube च्या नवीन अपडेटनंतर, युट्यूब अॅप खाली नमूद केलेल्या iPhone आणि iPad मॉडेल्सना सपोर्ट करणार नाही. तुम्हाला या जुन्या डिव्हाइसेसवर YouTube चालवायचे असेल, तर अजूनही एक मार्ग शिल्लक आहे. ते म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल ब्राउझरवर जाऊन youtube.com द्वारे YouTube अ‍ॅक्सेस करू शकता. परंतु लक्षात ठेवा, ब्राउझर व्हर्जनमध्ये अ‍ॅपसारखे स्मूथ स्क्रोलिंग, ऑफलाइन व्हिडिओ सेव्हिंग फीचर आणि उच्च दर्जाचे स्ट्रीमिंग टूल्स असे अनेक फीचर्सचा लाभ घेऊ शकणार नाही.

आयफोन 6 एस प्लस (iPhone 6s Plus)

आयफोन 6 एस (iPhone 6s)

आयफोन 7 प्लस (iPhone 7 Plus)

आयफोन 7 (iPhone 7)

आयपॉड टच (सातवी जनरेशंन) ( iPod Touch (7th Generation)

आयफोन एसई (पहिली पिढी) (iPhone SE (1st Generation)

आयपॅड मिनी 4 (iPad mini 4)

आयपॅड एअर 2 (iPad Air 2)

अशातच एखाद्या अ‍ॅपने जुन्या मॉडेल्सना सपोर्ट बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर याआधी व्हॉट्सअॅपने देखील आयफोन आणि आयपॅडच्या जुन्या मॉडेल्सना सपोर्ट करणे सपोर्ट करणे बंद केले आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की डेव्हलपर्स ॲडव्हान्स सॉफ्टवेअरसह येणाऱ्या नवीन डिव्हाइसेसवर लक्ष केंद्रित करत आहेत.

युट्यूब अ‍ॅप वापरायचे असेल तर काय करावे?

जुन्या डिव्हाइसेसमध्ये आता नवीन अ‍ॅप्स चालवण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा आणि परफॉर्मेंस फीचर्स नाहीत. म्हणूनच हे ॲप हळूहळू कमी यूझर बेस असलेल्या डिव्हाइसेससाठी समर्थन बंद करत आहेत. जर तुम्ही अजूनही जुन्या फोन किंवा टॅबलेटवर अवलंबून असाल आणि YouTube किंवा WhatsApp सारखे आवश्यक अ‍ॅप्स चालत नसतील, तर कदाचित अपग्रेड करण्याची ही योग्य वेळ आहे. जर तुम्हाला आयफोनवर YouTube अॅप चालवायचे असेल, तर तुम्हाला iOS 16 किंवा त्यावरील OS आवृत्तीसह येणारा नवीन फोन खरेदी करावा लागेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.