AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रोमावर मिळतोय ॲपलचा मॅकबुक निओ अगदी स्वस्तात, जाणून घ्या सर्वोत्तम डील्स

ॲपलने नुकताच त्यांचा सर्वात स्वस्त लॅपटॉप मॅकबुक निओ, 69 हजा 900 किमतीत लाँच केला आहे. मात्र क्रोमाच्या 'एव्हरीथिंग ऍपल सेल'मधील विविध ऑफर्सचा लाभ घेऊन तो फक्त या कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या लॅपटॉपच्या सर्वोत्तम डील्सबद्दल जाणून घेऊयात.

क्रोमावर मिळतोय ॲपलचा मॅकबुक निओ अगदी स्वस्तात, जाणून घ्या सर्वोत्तम डील्स
Apple MacBook Neo Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 08, 2026 | 3:51 PM
Share

गेल्या महिन्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपलने विशेषतः विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांचा सर्वात स्वस्त लॅपटॉप सादर केला. कंपनीने त्याचे नाव मॅकबुक निओ ठेवले आहे. आयफोन बनवणाऱ्या या कंपनीला आपल्या इकोसिस्टममध्ये सहज प्रवेश मिळावा यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर या लॅपटॉची सुरुवातीची किंमत 69 हजार 900 रूपये असली तरी ऑफर्समुळे तुम्ही हा लॅपटॉप 40 हजार रूपयांनी स्वस्त किमतीत खरेदी करू शकता. चला लॅपटॉपच्या या खास ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

मॅकबुक निओ स्वस्तात कसा खरेदी करायचा?

ॲपलच्या नवीन मॅकबुक निओची किंमत 69 हजार 900 रूपये आहे, पण तुम्हाला प्रत्यक्षात हा लॅपटॉप खरेदी करताना तेवढे पैसे देण्याची गरज नाही. कारण क्रोमाच्या ‘एव्हरीथिंग ॲपल’ सेलमध्ये या लॅपटॉपवर उत्तम ऑफर्स मिळत आहेत. जर तुम्ही उपलब्ध ऑफर्सचा वापर केला, तर त्याची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.

विद्यार्थी आणि शिक्षकांना या लॅपटॉपवर विशेष सवलत मिळू शकते, ज्यामुळे किंमत 62 हजार 910 रूपयांपर्यंत कमी होते. क्रोमा या लॅपटॉपवर 7000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. तुमच्या जुन्या लॅपटॉपनुसार तुम्हाला 12 हजार 500 रूपयां पर्यंतचे अतिरिक्त एक्सचेंज मूल्य देखील मिळू शकते.

याव्यतिरिक्त, हा लॅपटॉप 4 हजार रूपयांपर्यंतच्या बँक कॅशबॅकसह देखील उपलब्ध आहे. या सर्व ऑफर्सचा लाभ घेतल्यानंतर लॅपटॉपची किंमत अंदाजे 39 हजार 410 पर्यंत कमी होते. एकूणच या किमतीत हा लॅपटॉप खरेदी करणे उत्तम आहे.

मॅकबुक निओची प्रमुख वैशिष्ट्ये

या परवडणाऱ्या ॲपल लॅपटॉपमध्ये 13-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. यात सुस्पष्ट व्हिज्युअल्स, आकर्षक रंग आणि 500 निट्सपर्यंतची ब्राइटनेस मिळते. हा A18 प्रो चिपसेटवर चालतो.

ॲपलचा दावा आहे की तुम्ही एकाच वेळी अनेक ब्राउझर टॅब चालवत असाल, कंटेंट स्ट्रीम करत असाल किंवा डॉक्युमेंट्सवर काम करत असाल तरीही दैनंदिन वापरासाठी त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. यात 16-कोअर न्यूरल इंजिनचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे हा लॅपटॉप पूर्णपणे फॅनविरहित आहे. यात 1080p फेसटाइम कॅमेरा, दोन मायक्रोफोन आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे व्हिडिओ कॉल्स आणि मीडिया पाहणे अत्यंत सोपे होते. कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी 16 तासांपर्यंत टिकू शकते.

Follow Us
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर